HW News Marathi
Covid-19

विठू माऊलींच्या प्रस्थान सोहळ्यापूर्वी २२ वारकरी कोरोना पॉझिटिव्ह

आळंदी | राज्यात माऊलींची वारी सूरु झाली असून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या चलपादुका आज (२ जुलै) निमंत्रित वारकऱ्यांच्या उपस्थितीत प्रस्थान ठेवणार आहेत. या पार्श्वभूमीवर काल निमंत्रित २०४ वारकऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी घेण्यात आली. विशेष म्हणजे या चाचणीत आळंदीच्या नगराध्यक्षांसह तब्बल २२ वारकऱ्यांना कोविडची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रस्थान सोहळ्यापूर्वी एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायी पालखी रद्द करण्यात आली होती. १० मानाच्या पालख्या बसन

घेऊन जाण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे.

आळंदी देवस्थान व आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित केलेल्या वारकरी, मानकरी, टाळकरी, गावकरी यांची दोन दिवस कोविड – १९ ची चाचणी करण्यात आली आहे. कोविड चाचणी नंतर संबंधित वारकऱ्यांना लगतच्या फ्रुटवाले धर्मशाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. दरम्यान संबंधित वारकऱ्यांच्या चाचणीचे अहवाल आल्यानंतर एकूण २२ सहभागी होणारे वारकरी, आळंदीच्या नगराध्यक्षा तसेच मंदिरातील कर्मचारी पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह असलेले वारकरी आळंदीत दाखल झाल्यानंतर अन्य ज्यांच्या संपर्कात आले असतील त्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये काय सुरु आणि काय बंद राहणार?

– पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवेमधील दुकाने आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

– अत्यावश्यक दुकाना व्यतिरिक्त इतर दुकाने सोमवार शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. शनिवार व रविवार पूर्णतः बंद राहतील.

– मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह, संपूर्णतः बंद राहतील.

रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट हे सोमवार ते दुपारी ४ वाजेपर्यंत आसन क्षमतेच्या 50% क्षमतेने सुरु राहतील.

– दुपारी ४ नंतर तसेच शनिवार व रविवार फक्त पार्सल सेवा / घरपोच सेवा रात्री ११ पर्यंत सुरु राहील.

– लोकल ट्रेन मधून फक्त वैद्यकीय सेवेसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व महिलांसाठी शासकीय कर्मचारी, विमानतळ सेवा, बंदरे सेवायांच्या कर्मचाऱ्यांना प्रवास करणेस परवानगी राहील.

– पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील सार्वजनिक ठिकाणे ( उद्याने ) खुली मैदाने, चालणे व सायकलिंग आठवड्यातील सर्व दिवस सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरु राहतील.

– सूट देण्यात येत असलेल्या आस्थापना / सेवा व्यतिरिक्त सर्व खाजगी कार्यालये कामाचे दिवशी ५०% कर्मचारी क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील.

– पिंपरी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा व कोविड १९ व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय कार्यालये १०० % क्षमतेने सुरु राहतील.

– शासकीय कार्यालये अत्यावश्यक / कोरोना विषयक कामकाज करणाऱ्या कार्यालयां व्यतिरिक्त ) 50% अधिकारी / कर्मचारी उपस्थितीत सुरु राहतील. उपरोक्त कार्यालये / आस्थापना यांना यापेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित असणे आवश्यक असल्यास संबंधित आस्थापना प्रमुख यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांची परवानगी घ्यावी.

– सर्व आउटडोअर स्पोर्ट्स सर्व दिवस सकाळी ५ ते ९ या वेळेत सुरु राहतील.

– सामाजिक, धार्मिक कार्यक्रम व मनोरंजन कार्यक्रम यास ५० लोकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवारदुपारी ४ वाजपर्यंत परवानगी राहील. उपरोक्त कार्यक्रमाचा कालावधी हा 3 तासांपेक्षा जास्त असू नये सदर ठिकाणी खाद्यपदार्थचे सेवन करण्यास प्रतिबंध राहील.

– आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमात नियमांचे चे पालन करावे. आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच बारंबार नियमांचा भंग झाल्यास सदर आस्थापनाचे परवाना रद्द करणे अथवा केंद्र शासन कोविड आपत्ती संपूर्णपणे संपली असे घोषित करेल त्या दिवसापर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येतील.

– पिंपरी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील. सदर ठिकाणी दैनंदिन पूजा / अर्चना करण्याकरिता परवानगी राहील.

लग्न समारंभ कार्यक्रम जास्तीत जास्त ५० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी विवाह संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

– अंत्यसंस्कार, दशक्रिया व त्यांच्याशी निगडीत कार्यक्रम जास्तीत जास्त २० लोकांच्या उपस्थितीत करणेस परवानगी राहील. शासनाने निर्गमित केलेल्या आदेशातील अटी / मार्गदर्शक सूचनांनुसार धार्मिक स्थळी अंत्यविधीशी संबंधित कार्यक्रम मर्यादित लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी राहील.

– महानगरपालिका क्षेत्रामधील ज्या बांधकामाच्या ठिकाणी कामगारांची राहण्याची व्यवस्था आहे असे बांधकाम सुरु ठेवता येतील. तथापि, बाहेरून येणारे कामगार असल्यास असे बांधकाम दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी राहील. मात्र बाहेरून येणारे कर्मचारी हे दुपारी ४ वाजता तेथून घरी जाण्यासाठी बाहेर पडतील.

– कृषी संबंधित दुकाने आणि त्यांच्याशी संबंधित आस्थापना ( बी-बियाणे, खते, उपकरणे व त्यांच्याशी निगडीत देखभाल व दुरुस्ती सेवा इत्यादी ) तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती मधील शेतमालाची विक्री करणारे दुकाने / गाळे हे आठवड्यातील सर्व दिवस दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

– ई कॉमर्स सेवांना सर्व वस्तू व सेवा यांचा पुरवठा करण्याकरिता परवानगी राहील.

– पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास ( जमावबंदी ) प्रतिबंध राहील तसेच सायंकाळी ५ नंतर अत्यावश्यक कारण वगळता ) संचारबंदी लागू राहील.

व्यायामशाळा, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, wellness centers आसन क्षमतेच्या ५० % क्षमतेने पूर्व नियोजित वेळेनुसार दुपारी ४ वाजेपर्यंत सुरु

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना ७वा वेतन आयोग लागू !

News Desk

नितीन गडकरींच्या प्रयत्नातून भिलईमधून राज्यात ऑक्सिजनचा पहिला टँकर दाखल !

News Desk

ही वेळ सरकार आणि विरोधी पक्ष यांनी हातात हात घालून महाराष्ट्राची सेवा करण्याची आहे

News Desk