HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#coronavirus : राज्यात पाच जणांचा मृत्यू, दिवसभरातला ‘कोरोना’चा दुसरा बळी

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर कोरोना राज्यातील मृतांच्या आकड्यातही वाढ होत आहे. कोरोनामुळे मुंबईत आता आणखी एक बळी गेला आहे. ६३ वर्षीय महिलेचा मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोरोनाची लागण झाल्यामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात एका दिवसात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.   त्यामुळे राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा ५ वर गेला आहे. तर देशातील कोरोना बळींची संख्या आता १४ वर पोहोचली आहे.

दरम्यान, आज (२६ मार्च) सकाळी नवी मुंबईतही एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. नवी मुंबईतील पीडित महिला वाशी इथली रहिवासी होती. तिच्यावर आधी खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर तिला कोरोनावरील उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२६ वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गमधील कणकवलीत पहिला रुग्ण कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्या या कोरोनाबाधित रुग्णाची माहिती दिली आहे तर मुंबई-ठाण्यात प्रत्येकी एका नव्या रुग्णाला ‘कोरोना’ची लागण झाली आहे. तर तिकडे नागपुरातही एक नवा रुग्ण आढळला आहे. काल (२५ मार्च) दिवसभरात १५ नवे रुग्ण आढळल्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर गेली होती.

 

Related posts

मराठा आरक्षणावरील सुनावणी आता पुढील वर्षी

News Desk

RamMandir : उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-याला मनसे शुभेच्छा !

News Desk

सचिन अहिर यांची शिवसेनेच्या उपनेते पदी निवड

अपर्णा गोतपागर