HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांची अजित पवारांनी खडसावून केली कान उघडणी

बीड | काही महिन्यांपासून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांत आपसात मोठी नाराजी असल्याच्या घटना समोर आल्या याचा परिणाम चक्क आर्थसंकल्पीय अधिवेशनात बीड जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवरून राष्ट्रवादीच्या आमदारांनी 2 आमदारांनी पालकमंत्र्याच्या विरोधात बंड पुकारला होता. याच कारणावरून बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदार व मंत्र्यांचे आपसात मतभेद असल्याचे समोर आले होते. याच कारणावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर असतांना केज येथील येडेश्वरी साखर कारखान्याचे चेअरमन तथा बीड जिल्ह्यातील माजी जिल्हाध्यक्ष बजरंग बप्पा सोनवणे हेही काहीसे नाराज असल्यामुळे त्याची ही नाराजी दूर करण्यासाठी आणि बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या आमदारात व पालकमंत्री यांच्यातील आपसी वाद दुर करण्यासाठी अजित पवार हे बीड दौऱ्यावर होते.

कार्यक्रम निमित्त बोलतांना अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील आजी माजी आमदार, जिल्हाध्यक्ष तथा पालकमंत्री यांना उद्देशू म्हणाले की, येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने बीड जिल्ह्यात काम चांगले झाले पाहिजेत जनता त्यांचे काम करत असते मात्र आपल्या स्टेज वरच्या मान्यवरात एकमत असले पाहिजेत म्हणत स्टेज वर उपस्थित मान्यवरांची अजित पवारांनी खडसावून कान उघडणी केली. पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, म्हणून म्हणत आहे उगीच आडे तट्टू पडण्याची भूमिका तुम्ही घेऊ नका. येणाऱ्या काळात या जिल्ह्यात खासदार हा राष्ट्रवादीचा निवडून येणार यासाठी बीड च्या सर्व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजेत तसेच मागे जिल्ह्याला 4 आमदार निवडून दिलेत मात्र यंदा 6 आमदार जिल्ह्यातील पंचायत समित्या आणि जिल्हापरिषद असे सर्व राष्ट्रवादीच्या ताब्यात आले पाहिजेत म्हणतअसे खडसावून दादांनी कानउघाडणी कार्यकर्त्यांची केली. तर मागच्या वेळेसचे अपयश हे याया वेळेस धुऊन काढायचे आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

सर्वांना एकत्र घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका आपल्याला एकोप्याने लढाईच्या आहेत, असे ही ते म्हणाले. तर बजरंग बाप्पांना मात्र येणाऱ्या काळात नवीन जबाबदारी मिळणार असल्याचे ही या प्रसंगी बोलताना अजित पवार यांनी सांगितले. ते बीड जिल्ह्यातील केज येथील येडेश्वरी साखर कारखाना लिमिटेड चे चेअरमन बजरंग बप्पा सोनवणे यांच्या साखर कारखान्यावर आसवणी (डीस्टीलरी) विस्थारीत 60 KLPD प्रकल्पाच्या उदघाटन सोहळया प्रसंगी बोलतांना म्हणाले. 

यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील तसेच राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड तथा परभणी चे पालकमंत्री धनंजय मुंडे सह बीड जिल्ह्यातील आमदार व आजी माजी जिल्हाध्यक्ष सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उवस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भूखंड घोटाळ्यात फडणवीसांचीही चौकशी करा, अंजली दमानिया यांनी केली कोर्टात मागणी

News Desk

Vaccination आणि क्रिकेट दोन्हीत भारतच… ‘ पंतप्रधानांनी केलं अभिनंदन!

News Desk

वैभववाडीत भाजपला खिंडार, ७ नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार

News Desk