HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

#CoronaInMaharashtra | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा १२५ वरून थेट १३१ वर

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा थोड्याच वेळापूर्वी ३ ने वाढून १२५ इतका झाला होता. त्यानंतर आता पुन्हा या आकड्यात ६ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता १२५ वरून थेट १३१ वर जाऊन पोहोचला आहे. राज्यात आता सांगलीत ३, पुण्यात १ तर कोल्हापुरात कोरोनाच्या २ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, थोड्याच वेळापूर्वी ३ नवीन रुग्णांची नोंद झाली असून गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२५ झाली होती. त्यामुळे, राज्यात तासागणिक वाढत जाणारा हा आकडा अत्यंत चिंताजनक आहे.

“कोरोनाच्या चाचणीसाठी महाराष्ट्रातील धुळे, अकोला, औंगाबाद, सोलापूर, मिरज, नागपूर या ठिकाणच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध झाली असून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) त्याला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे केली”, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी ट्विट करून दिली आहे. “महाराष्ट्रात कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आणि आरोग्य विभागाच्या कामगिरीबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी यावेळी समाधान व्यक्त केले”, असेही राजेश टोपेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“अत्यावश्यक वैद्यकीय संसाधने जशी एन ९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क, पीपीई, व्हेटीलेटर याची आवश्यक ती उपलब्धता राज्यात आहे. मात्र आपात्कालीन परिस्थिती ओढावल्यास भविष्यकालीन तरतूद म्हणून या अत्यावश्यक वैद्यकीय साधनासामुग्रीची पूर्तता केंद्र शासनाने करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली”, अशीही माहिती राजेश टोपेंनी आपल्या ट्विटद्वारे दिली.

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा १३१ वर

मुंबई ४९
पिंपरी-चिंचवड १२
पुणे १९
सांगली १२
नवी मुंबई ६
कल्याण ६
नागपूर ५
यवतमाळ ४
अहमदनगर, ३
ठाणे ३
सातारा २
पनवेल २
उल्हासनगर १
औरंगाबाद १
रत्नागिरी १
वसई विरार १
पुणे ग्रामीण १
सिंधुदुर्ग १
कोल्हापूर २

Related posts

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

News Desk

मराठा आंदोलनात पोलीस कॉन्स्टेबलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

News Desk

पालघरमध्ये मतदान केंद्रावर गोंधळ, वोटिंग मशीनमध्ये बिघाड

News Desk