HW News Marathi
Covid-19

बीडमध्ये कोरोनाचा पहिला बळी, ६५ वर्षिय महिलेचा मृत्यू

बीड | आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण )येथे कोरोनाबाधित आढळलेल्या ६५ वर्षिय महिलेचा पहाटे मृत्यू झाला. कालच (१७ मे) तिच्यासह सात जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले होते. मुळची पिंपळगाव ( ता.जि.नगर) येथील ती रहिवासी असून मुंबईहून सांगवी येथे नातेवाईकाकडे आली होती. जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला. उपचारादरम्यान आज (१८ मे) पहाटे महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

शनिवारी (१६ मे) दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याच्या धक्क्याने सावरण्याआधीच बीडकरांना रविवारी मोठा धक्का बसला. आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) येथे नातेवाइकांकडे आलेल्या नगर जिल्ह्यातील पिंपळगाव येथील मूळ रहिवासी सात जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यात ३ पुरुष, दोन महिला व दोन बालकांचा समावेश आहे. त्यामुळे बीडचा कोरोना बाधितांचा आकडा आता नऊ झाला आहे.

शनिवारी मुंबईहून विनापरवाना बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या दोन कुटुंबांतील दोन जणांना कोरोनाची बाधा झालेले रुग्ण आढळले. इटकूर (ता. गेवारई) येथील १२ वर्षीय मुलगी आणि हिवरा (ता. माजलगाव) येथील एका व्यक्तीचा यात समावेश आहे. या गावांच्या ३ किलोमीटरचा परिसर कंटेंनमेंट झोन, तर सात किलोमीटरचा परिसर बफर झोन म्हणून घोषित केला आहे. गेवराई, बीड, माजलगाव आष्टी या चार तालुक्यांतील एकूण ४३ गावे अनिश्चित काळासाठी बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले.

गेवराईसह बीड तालुक्यातील २० गावे बंद

गेवराई तालुक्यातील इटकूरमध्ये रुग्ण सापडल्यानंतर गेवराई व बीड तालुक्यात २० गावे कंटेनमेंट व बफर झोनमध्ये आली. कंटेनमेंट झोनमध्ये गेवराई तालुक्यातील इटकूर,हिरापूर, शिंपेगाव, कुंभारवाडी, तर बीड तालुक्यातील खामगाव, नांदूरहवेली, पारगाव जप्ती तर, बफर झोनमध्ये गेवराईमधील लोळदगाव, अंकोटा, शहाजानपूर चकला, मादळमोही, कृष्णनगर, पाडळशिंगी, टाकळगाव, बीड तालुक्यातील आहेर चिंचोली, कामखेडा, पेंडगाव, हिंगणी हवेली, तांदळवाडी हवेली, पारगाव सिरस या गावांचा समावेश आहे.

माजलगावातील १० गावांचा समावेश

हिवरा येथेही ३ किमीचा कंटेंनमेंट, तर ७ किमीचा बफर झोन तयार केला. दहा गावांचा यात समावेश आहे. कंटेनमेंट झोनमध्ये हिवरा, गव्हाणथडी, काळेगाव हवेली, डुब्बाथडी, भगवान नगर, तर बफर झोनमध्ये राजेगाव, सुर्डी, महतपुरी, वाघोरा, वाघोरा तांडा यांचा समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात येत्या ६ ते ८ आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा अंदाज

News Desk

कडक लॉकडाऊन करा किंवा निर्बंध पूर्णतः काढा, राजेश टोपेंची मुख्यमंत्र्यांना विनंती 

News Desk

कोरोनासह म्युकर मायकोसिसच्या उपचारासाठी निधी कमी पडू देणार नाही – अजित पवार

News Desk