HW News Marathi
महाराष्ट्र

नाशिकमधील मालेगाव शहरात कोरोनाचा पहिला बळी

नाशिक | देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत आहे. कोरोनामुळे नाशिकमधील मालेगाव शहरात पहिला बळी गेला आहे. आता नाशकातील कोरोना रुग्णांची संख्या सहावर पोहोचली आहे. त्यापैकी ५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले, तर १ कोरोना निगेटिव्ह आहे. या पाच जणांपैकी एकाचा काल (८ एप्रिल) मृत्यू झाला. तर इतर चार जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मृत व्यक्ती ही ५१ वर्षीय पुरुष असून ती मालेगांवातील रहिवाशी होती. ते दोन महिन्यांपूर्वी हज यात्रेला जाऊन आल्याची माहिती आहे. त्यांचा कोविड-19 चाचणीचा अहवाल येण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. आज (९ एप्रिल) सकाळी रुग्णाची प्राणज्योत मालावली. मृत्यूनंतर या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने प्रशासन हादरले गेले आहे.

सध्या राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ११३५ वर येऊन पोहोचली आहे. तर कोरोनाच्या ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली. तसेच कोरोनाबाधित ११७ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात ९४२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल (८ एप्रिल) दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वास्तविक हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केलाय – अण्णा हजारे  

News Desk

आज पंतप्रधानांसह ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत होणार उदयनराजेंचा भाजप प्रवेश

News Desk

किरीट सोमय्या पायऱ्यांवरून पळताना पडले; पुण्यात शिवसैनिकांचा राडा

Manasi Devkar