मुंबई | गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्ष, मात्र घरी थांबून कोरोनाला हरवू, असा संकल्प करा, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. टोपे यांनी आज (२४ मार्च) फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी टोपेंनी राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १०६ वर गेल्याची माहिती दिली. यावर दिलासा देणारी गोष्टी म्हणजे राज्यात दोन कोरोना रुग्णांवर अतिदक्षा विभागात उपचार सुरू आहे. तर बाकी कोरोना रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिला आहे. राज्यात औरंगाबादमध्ये १, मुंबईमध्ये १२, पुण्यात २ अशा एकूण १५ जणांना डस्चार्ज दिला जाऊ शकतो. ही एक समाधानाची बाब आहे. यातून बरे होता येते.
#Coronavirus cases rise to 106 in Maharashtra; three deaths reported in the state so far: State Health Minister Rajesh Tope (File photo) pic.twitter.com/7QOZCZcmGD
— ANI (@ANI) March 24, 2020
“नागरिकांकडून अजूनही नियम पाळले जात नाहीत. भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डिस्टिंगचा नियम पाळला जात नाही. तो पाळला जावा, आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. तसेच मुंबई, पुणे येथे कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त असल्याने या दोन्ही शहरांतील नागरिकांकडे ग्रामिण भागातील लोक संशयाने पाहत आहेत. हे योग्य नाही. मुंबई, पुण्यातून मूळगावी जर कुणी येत असेल तर अशा व्यक्तींना गावात येण्यापासून अडवू नका. ही आपलीच माणसे आहेत. तेव्हा त्यांच्याशी माणुसकीने वागा. त्यांना गावबंदी करण्यासारखी असंस्कृत पावले टाकू नका, असे आवाहन टोपे यांनी केले. मुंबई-पुण्यातून गावात परतणाऱ्या लोकांनीही सोशल डिस्टन्सिंग पाळावे, असे आरोग्यमंत्र्यांनी नमूद केले आहे.
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 101 झाली आहे. आज पुणे येथे 3 तर सातारा येथे 1 बाधीत रुग्ण आढळून आला.#CoronaVirusUpdates #MeechMazaRakshak #मीचमाझारक्षक #मैंहीमेरारक्षक
— Rajesh Tope (@rajeshtope11) March 24, 2020
‘मी घरी थांबणार, मी कोरोनाला हरवणार’ हा पण आपण सगळ्यांनी करूया असे आवाहन टोपे यांनी यावेळी राज्यातील जनतेला केले. उद्या गुढीपाडवा सण आहे. या निमित्ताने आपण करोनावर मात करण्याचा. या विषाणूविरुद्धच्या लढाईत विजय मिळवण्याचा संकल्प करूया, असेही टोपे यांनी नमूद केले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.