HW News Marathi
महाराष्ट्र

#CoronaVirus : जाणून घ्या…संचार बंदीमध्ये काय सुरू असणार, तर काय बंद

मुंबई। कोरोना प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. हा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्यात आज (२३ मार्च ) संचार बंदी लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाद्वारे जनतेची संवाद साधला संचार बंदीची घोषणा केली.

 

“रविवारी (22 मार्च) राज्यात कलम १४४ लागू केले होते. त्यानंतर आता राज्यात संचारबंदी लागू केली आहे. तसेच आपण इतर राज्याच्या सीमा बंद केल्या होत्या. आज (२३ मार्च) आपण राज्यातील जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद करीत आहोत,” असेही मुख्यमंत्री म्हणाले.

आपण आता अगदी निर्णायक टप्प्यावर आलो आहोत. आपण कोरोनाचा प्रादुर्भाव जर आत्ताच रोखला नाही तर जगात होते आहे तसे थैमान होईल, असे इशारा मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.

संचार बंदीमध्ये हे सुरू राहणार

  • जीवनावश्यक वस्तू – अन्नधान्य, औषधे, बेकरी, दवाखाने, पशुखाद्य, बियाणे इत्यादी दुकाने/सेवा सुरू राहणार.
  • खासगी वाहने अत्यावश्यक कारणांसाठी असेल तरच सुरु राहतील. रिक्षा, टैक्सी यामधील प्रवाशांची संख्या मर्यादित असेल.

संचार बंदीमध्ये हे बंद असणार

  • आजपासून राज्यभरात संचारबंदी (कर्फ्यू) लागू.
  • आता राज्यातल्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही.
  • खासगी वाहने, बसेस यांची वाहतूक बंद. टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहने फक्त अत्यावशक सेवांसाठीच चालतील.
  • कोरोना विषाणूशी सुरू असलेला लढा आता निर्णायक वळणावर आलाय. हा टर्निंग पॉइंट आहे.
  • आत्ता रोखू शकलो नाही तर जगभर घातला तसा थैमान कोरोना विषाणू आपल्या इथे घालेल.
  • राज्यातली सर्व प्रार्थनास्थळे बंद – पुजारी पूजा करू शकतील, पण लोक जाऊ शकणार नाहीत.

    अधिक वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज लागली तर आशा आणि अंगणवाडी सेविका आणि होमगार्डच्या जवानांना प्रशिक्षण दिले जात्य.

  • घाबरून जाऊ नका. सर्वांनी मिळून या संकटावर मात करायची आहे. संकट आटोक्यात आहे. आटोक्यात ठेवायचे असेल तर या गोष्टी टाळाव्या लागतील.
  • थाळ्या वाजवल्यामुळे व्हायरस जात नाही. ते आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी करतोय. कोरोनाशी लढण्यासाठी आपल्याला घराबाहेर पडणे काही दिवस बंद करावे लागेल.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सॅनिटरी नॅपकिनवर आता जीएसटी नाही

News Desk

‘राज ठाकरेंच्या वक्तव्याला चंद्रकांत पाटलांचा दुजोरा!’

Jui Jadhav

अजित पवारांच्या दौऱ्यात बदल, कोल्हापूरऐवजी सांगलीला झाले रवाना

News Desk