HW News Marathi
Covid-19

पुणेकरांच्या चिंतेत वाढ, ब्रिटनहून आलेले १०९ प्रवासी सापडत नसल्याने उडाली खळबळ 

पुणे | संपूर्ण देशभरात कोरोनाच्या नव्या प्रजातीचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत महाराष्ट्रातून मुख्यत: पुण्यातून एक महत्वाची बातमी येत आहे. इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांचा पत्ता आणि फोन नंबरप्रमाणे संपर्क होत नसल्याने एकच खळबळ उडाली आहे. इंग्लंडहून १ डिसेंबरपासून पुण्यात आलेल्या प्रवाशांचा शोध लागत नसल्याने पुणे महापालिकेने आता शहर पोलिसांकडे धाव घेतली आहे. प्रवाशांची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पुणे पोलिसांना दिली असून त्यापैकी १०९ जणांचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.

इंग्लंडवरून आलेल्या ५४२ प्रवाशांपैकी १०९ प्रवाशांशी संपर्क होत नसल्याची माहिती हाती आली आहे. पत्ता आणि फोननंबरवरून त्यांना शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने या १०९ जणांचा शोध लागत नसल्याचे पोलिसांना कळवले आहे. आता त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

दरम्यान, सिरमकडे ४ ते ५ कोटी कोव्हिशिल्ड लस तयार असून जुलैपर्यंच ३० कोटी लस तयार करणार असल्याची माहिती सिरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी दिली. सरकारने कधी आणि किती लसी घ्यायच्या ते ठरवायचे आहे. येत्या काही दिवसातच परवानगी मिळाल्यानंतर लसचे वाटप करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची सुरुवात गुजरातपासून !

News Desk

फडणवीसांनी जर माझं ऐकलं असतं तर आज …! मुख्यमंत्रीपदावरून आठवलेंनी ऐकवले

News Desk

हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांच्या वापरवर WHO ने घातली बंदी

News Desk