HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २० हजारच्या पार

मुंबई | संपूर्ण जगाला सध्या कोरोनाचा विळखा आहे. त्याचप्रमाणे, आपल्याही देशात मोठ्या प्रमाणात वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. देशात गेल्या २४ तासांत १४८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ४९ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २० हजारच्या पार गेला असून एकूण ६५२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आज (२२ एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आले आहे.

महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बाब अशी कि, एकाच दिवशी तब्बल १५० जण कोरोनमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे, राज्यात आतापर्यंत कोरोनमुक्त होऊन डिस्चार्ज मिळून आपल्या घरी गेलेल्यांची संख्या ७२२ इतकी झाली आहे. यात ३१ ते ५० या वयोगटातील ३१८ तर २१ ते ३० वयोगटातील १६० आणि ५१ ते ६० वयोगटातील ९८ रुग्णांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ९१ ते १०० वयोगटातील एका व्यक्तीने यशस्वीरीत्या कोरोनावर मात केल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

देशात आतापर्यंत एकूण २०,४७१ कोरोनाबाधितांची नोंद झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. तर १५,८५९ कोरोनाबाधितांवर सध्या उपचार सुरु आहेत. मात्र, या स्थितीत एक दिलासादायक बाब म्हणजे ३,९५९ रुग्ण हे कोरोनमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभराची स्थिती देखील चिंता वाढवणारी आहे. संपूर्ण जगातील कोरोनाबाधितांची एकूण आकडा २५ लाखांच्याही पार गेला आहे. तर लाखो कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related posts

पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैन्याला हाय अलर्ट

News Desk

शुल्क विभागाचे धाडसत्र सुरू,१३ दिवसात १,४२९ गुन्ह्यांची नोंद

News Desk

“काय रे, अलिबागवरून आलायस का?”, असे कोणालाही विचारू नका

News Desk