HW News Marathi
देश / विदेश

आज संध्याकाळी देशातील सर्व पेट्रोल पंप राहणार बंद

मुंबई | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरातून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात येत आहे. याचसाठी देशभरातील सर्व पेट्रोल पंप देखील आज (२० फेब्रुवारी) या हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहणार आहेत. आज संध्याकाळी २० मिनिटांसाठी देशभरातील सर्व पेट्रोल पंप बंद राहणार आहेत. संध्याकाळी ७ ते ७.२० या वेळेत हे पेट्रोल पंप बंद राहणार आहेत.

सीआयपीडीकडून (द कन्सोर्टियम ऑफ इंडियन पेट्रोलियम डीलर्स) हा निर्णय घेण्यात आला आहे. ही २० मिनिटे पेट्रोल पंपावरील सर्व दिवे बंद करण्यात येणार आहेत. या सर्व पेट्रोल पंपावर बॅनर आणि शहीदांचे फोटो लावून दोन मिनिटे शांतता पाळून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. संध्याकाळी ७ ते ७.२० या वेळेत हे पेट्रोल पंप बंद राहतील, अशी माहिती सीआयपीडीचे प्रभारी सरचिटणीस के सुरेश कुमार यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लग्नासाठी पैसे दिले नाही म्हणून वडीलांचा खून

News Desk

Kulbhushan Jadhav : दुसऱ्यांदा काउन्सलर अ‍ॅक्सेसला पाकचा नकार, भारत आयसीजेमध्ये जाणार

News Desk

#Article370Abolished : एअर फोर्सच्या सी-१७ या विमानातून काश्मीरमध्ये ८ हजार तुकड्या रवाना

News Desk