HW News Marathi
महाराष्ट्र

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीची मतमोजणी, पालिकेवर कोणाचा झेंडा?

बेळगाव। बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 3 सप्टेंबर रोजी मतदान पार पडलं. आज (6 सप्टेंबर) या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता या मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष म्हणजे भाजप आणि काँग्रेस हे उतरले. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीनं त्यांना तगडं आव्हान दिलंय.बेळगाव महानगरपालिका निवडणुकीची मतमोजणी बीके मॉडेल हायस्कूल येथे आज होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. एकूण 58 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. त्याची आज मतमोजणी होईल. एकूण 385 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच मोठं आव्हान

महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर भाजप 55, काँग्रेस 45 जेडीएस 11, आम आदमी 37, एआयएमआयएम 7, अन्य दोन आणि अपक्ष 217 उमेदवारांचे भवितव्य आज ठरेल. मात्र भाजप आणि काँग्रेस या दोन्ही मोठ्या राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच मोठं आव्हान असेल.आजच्या मतमोजणीसाठी केंद्रात 500 पोलीस तैनात करण्यात आलेत. तर मतमोजणी केंद्राच्या आवारात कलम 144 जारी केला आहे. तर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडून नये यासाठी 1500 पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.

तसंच प्रशासनानं मतमोजणी केंद्राच्या दिशेनं जाणारे सर्व रस्त्यांवर बॅरिकेड्स लावले आहेत. दुपारी 12 वाजेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सचिन वाझे सरकारचा जावई आहे का?”, प्रविण दरेकरांचा सवाल

News Desk

#CoronaVirus : राज्यातील सर्व शहरांत कलम १४४ लागू, तर सरकार कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के

swarit

शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स!

News Desk