HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा अडचणीत!

मुंबई। आदित्य ठाकरे यांची संकल्पना असलेले राणी बागेतील पेंग्विन पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. मुंबई महापालिकेच्या राणी बागेतील पेंग्विन म्हणजे कंत्राटदारांसाठी सोन्याचं अंड देणारी कोंबडी असल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे. मुंबई महापालिकेत पेंग्विनवरचा खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. तीन वर्षांच्या पेंग्विनच्या देखभालीसाठी 15 कोटींचं टेंडर काढण्यात आलं आहे. त्यामुळेचे पेंग्विनवर होणाऱ्या खर्चावर काँग्रेसने निशाणा साधलाय. यापूर्वीही गेल्या तीन वर्षांसाठी 11 कोटींचं टेंडर काढले होते. पेंग्विनच्या देखभालीसाठी मुंबई महापालिकेचेच डॉक्टर नेमले जाणं शक्य असतांनाही बाहेरुन टेंडर काढून कंत्राटदार नेमण्याची गरज काय असा सवालची काँग्रेसचे मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उपस्थित केला.

पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी 15 कोटी खर्च अपेक्षित

यापूर्वीही मुंबईच्या राणीबागेत पेंग्विन आणण्यावरुन आणि त्यांच्या खर्चावरुन या प्रकल्पाला विरोध झाला होता. एकीकडे कोरोना, लॉकडाऊनमुळे महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट असताना पेंग्विनच्या आलिशान लाईफस्टाईलवर एवढा खर्च कशासाठी हा सवाल विरोधकांनी केलाय.पेंग्विन खरेदीसाठी आणि कक्षासाठी एकूण 25 कोटींचा खर्च झाला होता. त्यानंतर तीन वर्षाच्या देखभालीसाठी 11 कोटी खर्च झाले. त्यानंतर आता पुन्हा पुढच्या तीन वर्षांसाठी 15 कोटी खर्च अपेक्षित आहे. निविदा काढलेली रक्कम पेंग्विन प्रदर्शनाची देखभाल आणि वातानुकूलन सुविधा, लाइफ सपोर्ट आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा आणि पेंग्विनसाठी मासे, अन्न पुरवण्यासाठी खर्च केली जाईल.

2017 मध्ये दक्षिण कोरियातून आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनसाठी विशेष वातानाकुलित कक्ष उभारण्यात आला आहे. पेंग्विनच्या दररोजच्या देखभालीसाठी विशेष पशुवैद्किय अधिकारी आणि डॉक्टर्स नेमलेले आहेत. दररोज पेंग्विनसाठी विशेष खाद्य, विशेष प्रकारचे मासे आणि इतर सप्लिमेंटस् दिल्या जातात. गेल्या तीन वर्षात एक नवजात पिल्लू पेंग्विन आणि एका नर पेंग्विनचा मृत्यू झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्रिपद हे काही एनजीओचे पद आहे का ?, संजय राऊत यांचा भाजपला सवाल

News Desk

मंत्रिमडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी घेतले महत्त्वाचे १९ निर्णय

News Desk

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे उर्वरित कामही वेळेत आणि दर्जेदार व्हावे!– सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री

Aprna