HW News Marathi
Covid-19

ठरलं! जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची होणार ट्रायल

नवी दिल्ली | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा देशातील लहान मुलांना सर्वाधिक धोका आहे, असा इशारा अनेक तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सरकारकडून लहान मुलांच्या संरक्षणासाठी विशेष आणि महत्वाची पावले उचलण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जून महिन्यांपासून लहान मुलांवरील कोव्हॅक्सिन लसीच्या ट्रायलला सुरुवात होणार आहे.

भारत बायोटेकचे अधिकारी डॉ. राचेस एल्ला यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भातील संकेत दिले आहेत. आम्ही जून महिन्यापासून कोव्हॅक्सिनच्या पीडियाट्रिक ट्रायलला सुरुवात करत आहोत. त्यामुळे आगामी काही महिन्यांमध्ये जागतिक आरोग्य संघटना लहान मुलांवर कोव्हॅक्सिनचा वापर करण्यासाठी परवानगी देईल, अशी आशा डॉ. राचेस एल्ला यांनी व्यक्त केली आहे.

सध्या कोव्हॅक्सिनचे चांगले परिणाम पाहायला मिळत आहेत. त्यामुळे अनेक लोकांचे जीव वाचत आहेत. आम्ही लवकरच लसीचे उत्पादन वाढवू. यंदाच्या वर्षाअखेरपर्यंत आम्ही 70 कोटी लसींचे उत्पादन करु, असा दावाही डॉ. राचेस एल्ला यांनी केला. केंद्र सरकारने भारत बायोटकेला 1500 कोटी रुपयांच्या कोरोना लशींची ऑर्डर दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथ यांनी भारतामध्ये तयार होत असलेली नेझल व्हॅक्सीन गेमचेंजर ठरण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे लहान मुलांना लस देणे आणखी सोपे होणार आहे. लहान मुलांच्या शाळा पुन्हा सुरु होईपर्यंत आपल्याला लवकरात लवकर लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन कोरोनाच्या संसर्गाचा धोका कमी होईल, असे सौम्या स्वामिनाथ यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कपिल पाटलांचे महाराष्ट्र दिनी लाक्षणिक उपोषण

News Desk

देशात कोरोनाचा कहर! रुग्ण संख्येने ओलांडला २ लाखांचा टप्पा

News Desk

“डॉक्टरांवरील ते वादग्रस्त वक्तव्य मागे घ्या” आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांचं रामदेव बाबांना पत्र

News Desk