HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

भारतात जून-जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक असेल !

नवी मुंबई | “भारतात येत्या जून-जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त असू शकतो”, असे अत्यंत मोठे विधान एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनी केले आहे. कोरोनाचा संसर्ग जास्त वाढू नये यासाठी आपल्या देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. देशात सध्या तिसऱ्यांदा लॉकडाऊन जारी करण्यात आला. मात्र, देशात लॉकडाऊन जारी करूनही कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झालेली नाही. त्यानंतर, आता ही एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. येत्या काळात देशातील कोरोनाची स्थिती काय असेल ? असा प्रश्न गेले अनेक दिवस सर्वांनाच पडलेला आहे. याच पार्श्वभूमीवर एम्सचे डायरेक्टर डॉ. गुलेरिया यांनी केले आहे. त्यामुळे देशाने आता त्यादृष्टीने तयारी ठेवणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

“देशात लॉकडाऊन जारी केला म्हणजे कोरोना संपेल असा विचार जर तुम्ही करत असाल तर तसे काहीही होणार नाही. उलट भारतात येत्या जून-जुलैमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वात जास्त असू शकतो. देशात तब्बल ४० दिवसांच्या लॉकडाऊननंतरही कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट होताना दिसत नाही. जोपर्यंत देशात कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट दिसायला सुरुवात होत नाही. तोपर्यंत, स्थिती दिलासादायक आहे असे म्हणता येणार नाही. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा कमी व्हायला अजून बराच काळ लागेल”, असेही डॉ. रणदीप गुलेरिया सांगितले आहे. दरम्यान, डॉ. गुलेरिया यांच्या या विधानानंतर आता देशाने या आव्हानासाठी सर्व पद्धतीने तयार राहणे आवश्यक आहे.

देशातल्या कोरोनाबाधितांचा आकडा तासागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता देशातील आकडा ५० हजारांच्या पार गेला असून देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ५२, ९५२ इतका झाला आहे. सुरुवातीच्या तुलनेत आताच्या स्थिती देशाचा कोरोनाचा रुग्णांचा मृत्युदर कमी होत आहे, डब्लिंग रेट वाढत आहे, रिकव्हरी रेट देखील वाढत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, एकीकडे या दिलासादायक बातम्या येत असल्या तरीही देशातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. त्यामुळे, देशापुढे हे एक आव्हान आहेच.

Related posts

पावसासाठी दोन पुरुषांचा एकमेकांशी विवाह

News Desk

कसारा घाटातील पुलावर गोरखपूर एक्सप्रेसचा डबा घसरला

News Desk

उध्दव ठाकरे शिवनेरीच्या पवित्र मातीचा कलश अयोध्येला नेणार

News Desk