HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोनाबाधित पोलिसांच्या उपचारांसाठी नवी मुंबईत कोविड सेंटरची उभारणी

मुंबई | राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज (११ जून) कळंबोली येथील पोलीस मुख्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचाऱ्यांकरता नव्याने उभारण्यात आलेल्या निवारा कोविड केअर सेंटरचे उद्घाटन केले आहे. त्याचप्रमाणे, यावेळी अनिल देशमुख यांनी या संपूर्ण कोविड रुग्णालयाची पाहणी देखील केली. राज्यातील पोलीस दलात दिवसेंदिवस वाढत जाणारा कोरोनाचा संसर्ग सध्या शासन आणि प्रशासनापुढचे मोठे आव्हान आहे. अनेक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. तर पोलिसांच्या कुटुंबियांनाही कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर, कोरोनाग्रस्त पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबियांना योग्य ते उपचार मिळावेत यासाठी नवी मुंबईत कोविड सेंटरची उभारणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेतून चालते विषारी सापांची तस्करी

News Desk

MPSC ची परीक्षा होणार की नाही ? मोठी आणि महत्वाची बातमी

News Desk

भाजपचा पुढच्या महिन्यात सरपंच मेळावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

News Desk