HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र

देशात गेल्या २४ तासांत १२,८८१ नवे रूग्ण आढळले

नवी दिल्ली | गेल्या ८ महिन्यांपेक्षा जास्त काळ फक्त भारतच नाही तर संपुर्ण जगाला वेठीला धरणारा कोरोना बॅकफूटवर गेल्याचं आशादायी चित्र देशात निर्माण होऊ लागलं आहे. एकीकडे देशात दुसऱ्या लाटेची चर्चा असताना सध्याची आकडेवारी मात्र काहीशी दिलासा देणारी आहे. गेल्या २४ तासांत देशभरात फक्त १२ हजार ८८१ नवे को रूग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाचा फैलाव कमी वेगाने होत असल्याचं दिसून येत आहे. पण त्याचवेळी कोरोनाबाबत नागरिक जास्तच निर्धास्त झाल्यामुळे देशात दुसऱ्या करोना लाटेची देखील चर्चा सुरू झाली आहे. ही दुसरी लाट अधिक तीव्र आणि अधिक वेगाने पसरू शकते, असा अंदाज वैद्यक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

एकीकडे मृतांचा आकडा वाढला असताना एकूण कोरोना बाधितांच्या आणि कोविड रुग्णांच्या संख्येत देखील वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांमधल्या १२,८८१ रुग्णांसोबत देशातल्या एकूण बाधितांची संख्या आता १ कोटी ९ लाख ५० हजार २०१ वर पोहोचली आहे. यापैकी फक्त १ लाख ३७ हजार ३१० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जगाचा विचार करता गभरात बाधितांचा आकडा ११० कोटी ४ लाख ३५ हजार ८०५ इतका झाला आहे. आजघडीच्या जगाच्या लोकसंख्येच्या हा आकडा सुमारे १५ टक्के आहे. यापैकी २ कोटी ४ लाख ४१ हजार ४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर २२ कोटी ६ लाख ६५ हजार ५६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

 

 

Related posts

राज साहेबांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडला तर…!

News Desk

कंगनासारख्या नटवीनं शेतकऱ्याला ‘दहशतवादी’ म्हणणं हाच मोठा विनोद!

News Desk

पाकिस्तानमध्ये भगवा फडकावा, आम्हाला आनंद होईल – उद्धव ठाकरे

News Desk