HW News Marathi
Covid-19

डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ‘कोरोना पॉझिटिव्ह’ 

नवी दिल्ली | संपूर्ण जगभराला कोरोनाचा घट्ट विळखा आहे. अमेरिकेतही कोरोनाने मोठा धुमाकूळ घातला आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त आहे. ‘सीएनएन’च्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, रॉबर्ट ओ ब्रायन यांच्यासारख्या उच्च दर्जाच्या अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने अमेरिकेत खळबळ उडाली आहे. रॉबर्ट ओ ब्रायन काहीच दिवसांपूर्वी युरोपमधून परतले होते.

रॉबर्ट ओ ब्रायन युरोपमध्ये युके, फ्रान्स, जर्मनी आणि इटलीमधील काही अधिकाऱ्यांना भेटले होते. यावेळी त्यांनी सोशल डिस्टंसिंगचे नियम गांभीर्याने न पाळल्याचे म्हटले जात आहे. रॉबर्ट ओ ब्रायन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता डोनाल्ड ट्रम्प आणि रॉबर्ट ओ ब्रायन हे एकमेकांच्या थेट संपर्कात कधी आले होते ? वा त्यांची भेट कधी झाली होती ? याबाबत चर्चा सुरु आहे. मात्र, अद्याप कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मात्र, १० जुलैला हे एका कार्यक्रमात एकमेकांच्या संपर्कात आल्याचे म्हटले जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापुरात कोरोनाने पार केली शंभरी, तब्बल २१ नव्या रुग्णांची नोंद

News Desk

लडाखमध्ये तणाव, चीनने भारतीय सैन्यांना घेतले होते ताब्यात

News Desk

उस्मानाबादमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण; जिल्ह्यात भीतीचे वातावरण

News Desk