HW News Marathi
Covid-19

महापुरामुळे जिल्ह्याला कोरोना आणि साथीच्या आजारांचा विळखा- अदिती तटकरे

रायगड | पावसाच्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. पाणी तर ओसरलं पण आता भेटी आहे ती म्हणजे वाढणाऱ्या रोगाची. रायगडमध्ये अनेक लोक येत आहेत. मात्र, त्यामुळे आता कोरोनाचा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. तसेच रायगडमध्ये साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, असं सांगतानाच रायगडमध्ये १०० डॉक्टरांचं पथक काम करत असल्याचं पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं. तसेच महापुरामुळे जिल्ह्याचं ८०० कोटी रुपयांचं नुकसानही झाल्याचं तटकरे यांनी सांगितलं.

२५०० कोरोना अँन्टीजेन चाचणी किट देण्यात आल्या

रायगड जिल्हयात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पडसाद आता दिसायला लागले आहेत. पालकमंत्री अदिती तटकरे यांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. रायगड जिल्ह्यात बाहेरून भरपूर लोकं मदत घेऊन येत आहेत. त्यामुळे कोरोना पसरण्याची भीती जास्त आहे. या शिवाय साथीचे आजार पसरण्याची भीती जास्त आहे. मात्र साथीच्या आजारांना नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. महाड शहर आणि जिल्ह्यात 100 डॉक्टरांची पथकं तयार करण्यात आली आहेत. औषध आणि गोळ्यांचा साठा पाठवण्यात आला आहे. तसेच रायगड जिल्हा परिषदेला 2500 कोरोना अँन्टीजेन चाचणी किट देण्यात आल्या आहेत, असं तटकरे यांनी सांगितलं आहे.

अतिरिक्त मदत केली पाहिजे

रायगड मध्ये ८०० कोटींचं नुकसान झालं असून तिथल्या लोकांचे हाल होत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जिल्ह्यात अतिरिक्त मदतीची मागणी केल्याची माहिती अदिती टकरेंनी दिली आहे. महापुरामुळे रायगड जिल्ह्यात साधारण 800 कोटी रुपयांच नुकसान झालं आहे गेल्या दोन वर्षात रायगडवासियांना विविध संकटांना सामोरं जावं लागलंय. त्यामुळे रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत केली पाहिजे. तशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. रायगड जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. पंचनामे करून मदत लवकरात लवकर जिल्ह्याला मदत मिळायला हवी, असंही त्या म्हणाल्या आहेत.

स्थलांतर 8 महिन्यात करण्याची मागणी

डोंगरकडेच्या बाजूला वसलेल्या गावांचं स्थलांतर करण्याची मागणीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे. रायगड जिल्ह्यातील दरड कोसळण्याची शक्यता असणाऱ्या संभाव्य गावांच स्थलांतर 8 महिन्यात करण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच रायगड जिल्ह्याला अतिरिक्त मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करणार आहे. तळीये ग्रामस्थांच्या पुनवर्सनासंदर्भात योग्य तो निर्णय घेऊन पुनर्वसन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरीविरोधी कायदे रद्द करेपर्यंत काँग्रेस स्वस्थ बसणार नाही !

News Desk

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या वर्षपूर्ती निमित्ताने जनतेला पत्र

News Desk

आवाजावरून कोरोना चाचणी करणे आता होणार शक्य !

News Desk