मुंबई | राज्यात आज (३ सप्टेंबर) पुन्हा एकदा १५ हजारांच्या पुढे नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत १८,१०५ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ३९१ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण रुग्ण संख्या ८,४३,८४४ इतकी झाली आहे. तर ६,१२,४८४ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.
391 deaths and 18,105 new cases detected in the state today. The total number of positive cases in the state is 8,43,844 including 6,12,484 recovered patients, 2,05,428 active cases and 25,586 deaths: Maharashtra Health Department pic.twitter.com/eWfrvRnl9V
— ANI (@ANI) September 3, 2020
दरम्यान, केंद्रीय आरोग्य विभागानं सादर केलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्रासाठी एक दिलासादायक बाब समोर आली आहे. आठवड्याच्या संख्येच्या आधारावर गेल्या तीन आठवड्यांमध्ये महाराष्ट्रातील अॅक्टिव्ह केसेसमध्ये ७ टक्क्यांची घट झाली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनी दिली. आरोग्य विभागाच्या आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.