HW News Marathi
Covid-19

देशात नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट, कोरोनाबळीही २८०० च्या खाली

नवी दिल्ली | देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या २४ तासांत दिवसात १ लाख २७ हजार ५१० नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात २ हजार ७९५ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटतानाच कोरोनाबळींच्या संख्याही कमी झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे

२४ तासातील आकडेवारी

गेल्या २४ तासात भारतात १ लाख २७ हजार ५१० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २ हजार ७९५ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात २ लाख ५५ हजार २८७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात १५,०७७ नवे रूग्ण आढळले आहेत. १८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे ३३,००० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.

तर दुसरीकडे मुंबईत देखील कमालीची रूग्ण संख्या घट झाली आहे. मुंबईत केवळ ६७६ नवे रूग्ण आढळले आहेत. २९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५५७० रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर पुण्यातही केवळ १८० नवे रूग्ण आढळले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाशी लढण्यासाठी RBI च्या महत्त्वाच्या घोषणा ..

Arati More

राज्यात आज ८९४३ नवे रुग्ण तर रिकव्हरी रेट ७०.०९%

swarit

हो, ऑक्सिजनअभावी देशात अनेकांचा मृत्यू, गडकरींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल

News Desk