HW News Marathi
Covid-19

ठाण्यातील बाळकुम-साकेत येथे १०२४ बेड्सचे कोविड-१९ रुग्णालय उभारले

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिका, MMRDA, सिडको आणि MCHI, क्रेडाई ठाणे युनिट यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यात कोविड-१९ रुग्णालय उभारण्यात आले आहे. ठाण्यातील बाळकुम-साकेत येथे १०२४ बेड्सचे तळ अधिक १० मजल्यांचे कोविड-१९ रुग्णालय राज्य सरकारने तयार केले आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, “या रूग्णालयामध्ये एकूण १०२४ बेड्स असून ५०० बेड्स हे सेंट्रल ऑक्सिजनची सुविधा असलेले आहेत. यातील ७६ बेड्स हे आयसीयूचे असून १० बेड्स डायलिसिस रूग्णांसाठी तर १० बेडस ट्रॉमासाठी ठेवण्यात आलेले आहेत. आवश्यकता वाटल्यास या रूग्णालयामध्ये अतिरिक्त ३०० बेड्स निर्माण करता येऊ शकतात.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात आज ६७८ नवीन रुग्णांचे निदान, एकूण कोरोना बाधितांची संख्या १२ हजार ९७४ वर

News Desk

लॉकडाऊनमध्ये राज्यात आतापर्यंत तब्बल ६९ हजार गुन्ह्यांची नोंद

News Desk

अरुण गवळींची मुलगी लॉकडाऊनमध्ये अडकणार लग्नाच्या बंधनात

News Desk