नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग देशात वेगाने वाढत आहे. सध्या देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. तरी देखील कोरोनाची संख्या वेगाने वाढत आहे. देशात सध्या आणीबाणीसदृश्य परिस्थिती असल्यामुळे १४ एप्रिलला लॉकडाऊन उवणे शक्य नसल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (८ एप्रिल) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या गटनेत्यांशी चर्चेदरम्यान म्हटले होते. देशातील लॉकडाऊन १४ एप्रिलला उठवणार याबद्दल अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, देशातील ओडिशा राज्यात लॉकडाऊनचा ३० एप्रिलपर्यंत वाढवला आहे.
Odisha CM Naveen Patnaik has requested the Centre not to start train and air services till April 30th; Educational institutions in the state to remain closed till June 17th. https://t.co/z5R4a8Cyap
— ANI (@ANI) April 9, 2020
बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी आपल्या राज्यातील लॉकडाऊन आणखी १६ दिवसांनी वाढवले आहे. त्यामुळे ओडिशा राज्यातील लॉकडाऊन हा १४ एप्रिलनंतरही सुरू असणारे देशातील हे पहिले राज्य ठरले आहे. यादरम्यान ओडिशा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनुसार त्यांनी केंद्राला ३० एप्रिलपर्यंत रेल्वे आणि हवाई सेवा सुरु न करण्याची विनंती केली आहे. राज्यातील शैक्षणिक संस्थाही १७ जूनपर्यंत बंद राहणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.