HW News Marathi
Covid-19

पुण्यात २ स्वयंसेवकांना दिला ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस 

पुणे | कोरोनावर मात करण्यासाठी जगभरातून लस तयार करण्याचे काम सुरू आहे. भारतातही लस तयार करण्याचे काम सुरू आहे. पुण्याच्या भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेजमध्ये आज (२६ ऑगस्ट) दोन स्वयंसेवकांना ‘कोविशिल्ड’ लसीचा डोस देण्यात आला. ऑक्सफर्डच्या लसीची देशातील पहिली मानवी चाचणी पुण्यात करण्यात आल्याची माहिती माहिती डॉ. संजय ललवाणी यांनी दिली आहे. या दोन स्वयंसेवकांना ०.५ एमएलचा डोस देण्यात आला.

पुण्याच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाच्या प्रकल्पात या लसीचे उत्पादन झाले आहे. प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत डॉक्टरांनी पात्र ठरलेल्या दोन स्वयंसेवकांना कोरोना लसीचा डोस दिला. आधी आवश्यक वैद्यकीय तपासण्याकेल्यानंतर हा डोस देण्यात आला.लसीचे काही साईड इफेक्ट होतात किंवा नाही हे तपासण्यासाठी या दोन्ही स्वयंसेवकांना काही तास रुग्णालयात थांबावे लागणार आहे. पुढचे काही दिवस या स्वयंसेवकांच्या प्रकृतीवर डॉक्टर लक्ष ठेवणार आहेत. २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोना लस

News Desk

विश्वास नांगरे-पाटील, कृष्णप्रकाश यांच्यासह तब्बल ४५ जणांची बदली…

News Desk

राज्यात आज ८२४१ रुग्ण कोरोनामुक्त

News Desk