HW News Marathi
महाराष्ट्र

पंडित नेहरूंवर टीका करणे राज्यपालांना शोभत नाही, नाना पटोलेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल!

पुणे। पुण्यात नाना पटोले यांच्या हस्ते पूरग्रस्तांना आज मदत पाठवण्यात आली. सारसबाग चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. कोल्हापूर पूर पाहणीदरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीबाबत काँग्रेसच्या मनात कुठलीही शंका नाही. काँग्रेस सरकारची जासूसी करत नाही ते काम केंद्राचा आहे, केंद्र ते करतंय असं बोलत केंद्र सरकारवर टीका केली. तसंच त्यांनी राज्यपालांवरही हल्लाबोल केला आहे.

पूर परिस्थितीत मोदी काय मदत करतील

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राला मदत करावी अशी अपेक्षा आहे ते काय मदत करतात ते पाहू वादळाच्या वेळेस त्यांनी गुजरातला भेट दिली. मात्र महाराष्ट्राला भेट दिलेली नाही. त्यामुळे आता पूर परिस्थितीत मोदी काय मदत करतील हे पाहावे लागेल, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

पाठपुरावा मी करणार

पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मेट्रोचा पाया रोवला गेला. म्हणून आज या पक्षाने सात वर्षे देश मागे नेला आहे. त्याला श्रेय घ्यायचा असेल तर त्यांना लखलाभ असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली. त्याचबरोबर मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहोत असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सदाभाऊंचे मंत्रिपद कायम

News Desk

पाण्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ईलेक्ट्रिक बसचं उदघाटन!

News Desk