मुंबई | ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे (Jai Jai Maharashtra Mazha) गीत लवकरच महाराष्ट्राचे राज्यगीत होणार असल्याची माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिली आहे. या गाण्याचे राज्यगीत झाल्यानंतर अधिकृत गाणे असलेल्या देशामधील निवडक राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचा ही समावेश होऊ शकतो. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताला अधिकृत राज्य गीत म्हणून अंतिम रूप देण्याची तयारी सुरू आहे,अशी माहिती मुनगंटीवारांनी दिली आहे.
देशात फक्त 11 राज्यांचेच स्वत:चे वेगळे गाणे आहे. आता महाराष्ट्राचे देखील स्वत:चे गीत असेल. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गाणे येत्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मान्यात मिळणार असल्याचेही मुनगंटीवारांनी दिली आहे. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत कवी रादा बधे यांनी लिहिले असून श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिले आहेत. तर हे गीत कृष्णराव उर्फ शाहीर साबळे यांनी हे गायले आहे.
महाराष्ट्र 1 मे 1960 रोजी अस्तित्वात आले. यावेळी मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क येथे झालेल्या समारंभात शाहीर साबळेंनी हे गाणे गायले होते. साबळेंनी हे गाणे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यासमोर होते. साबळे हे 2015 मध्ये त्यांचे निधन झाले असून यंदाचे वर्ष हे साबळेंचे जन्मशताब्दी राज्यात साजरे केले जात आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.