HW Marathi
कोरोना महाराष्ट्र मुंबई राजकारण

उद्धवजी लाॅकडाऊनपेक्षा संचारबंदी करा !आव्हाडांची मागणी ..

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र लाॅकडाऊन केला आहे आणि संपुर्ण महाराष्ट्रात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. मात्र आज सकाळी जनता कर्फ्यु हटवल्यानंतर महाराष्ट्रातील लोकांनी ठिकठिकाणी गर्दी करायला सुरूवात केली आहे. मुंबई,पुणे या ठिकाणी लोकांची गर्दी पाहायला मिळाली. वाहतुक मोठ्या प्रमाणात वाढली असून सुरक्षेसाठी मुंबई-पुणे हायवेसुद्धा बंद करण्यात आला आहे.

आज लोकांनी केलेली गर्दी पाहता महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू करावी अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. सध्या वर्षा बंगल्यावर मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक सुरू आहे ,त्या बैठकीत संचारबंदीचा निर्णय होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आज पंजाबमध्ये संचारबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील गर्दी पाहता संचारबंदीचा निर्णय होऊ शकतो.

Related posts

#PulwamaAttack : देशात निर्माण झालेल्या एकतेला मतांमध्ये रूपांतरित करा !

News Desk

होर्डिंग प्रकरणी कॅप्शन अॅडव्हर्टाझिंग कंपनीच्या मालकाला अटक

अपर्णा गोतपागर

अन् भाषणादरम्यान हार्दिक पटेल यांच्या कानशिलात लगावली

News Desk