HW News Marathi
महाराष्ट्र

#COVID19 : राज्यातील कोरोनाबाधिताची संख्या ६९० वर, ५६ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज

मुंबई | राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. या एकट्या मुंबई २९, पुणे १७, पिंपरी-चिंचवड ४ अहमदनगर ३, औरंगबाद २ अशा एकूण राज्यात कालपासून (४ एप्रिल) ते आजपर्यंत (५ एप्रिल) ५५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ६९० वर येवून पोहोचली आहेगेल्या २४ तासात कोरोनाबाधित तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

सध्या महाराष्ट्र कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारी देशात प्रथम स्थानी आहे. राज्यात शनिवारी ७०८ जण विविध रुग्णालयात दाखल आहेत. तर कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या १४ हजार ५०४ नमुन्यांपैकी १३ हजार ७१७ जणांचे प्रयोशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तसेच, आतापर्यंत अनेकजण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत ५६ जण बरे होऊन घरी गेले आहेत.

 

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या

  • मुंबई – ४०६
  • पुणे + पिंपरी-चिंचवड – १०३
  • सांगली -२५
  • ठाणे व इतर मनपा – ७७
  • नागपूर – १७
  • अहमदनगर – २०
  • लातूर – ८
  • बुलडाणा – ५
  • यवतमाळ – ४
  • औरंगाबाद – ७
  • सातारा – ३
  • उस्मानाबाद – ३
  • कोल्हापूर – २
  • रत्नागिरी – २
  • जळगाव – २
  • सिंधुदुर्ग – १
  • गोंदिया – १
  • नाशिक – १
  • वाशिम – १
  • अमरावती -१
  • हिंगोली – १
  • इतर – १
  • इतर राज्य – गुजरात – १

एकूण – ६९०

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यपाल आमच्यावर न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत, अजित पवारांचे सूचक वक्तव्य

News Desk

सरपंच पदाची आरक्षण सोडत अखेर रद्द, राज्य सरकारचा निर्णय!

News Desk

माझा वाढदिवस साजरा करू नये, मुख्यमंत्र्यांचे पदाधिकाऱ्यांना आवाहन

News Desk