HW News Marathi
क्रीडा

सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

पुणे | सायकल रॅली ही एका दिवसासाठी नसून ती अविरतपणे चालली पाहिजे. अशा उपक्रमामुळे पर्यावरण संरक्षणासोबत नवीन पिढीला प्रेरणा व मार्गदर्शन मिळण्यास मदत होते. सायकल रॅली हे साहसाचे प्रतीक आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन राष्ट्रीय महिला आयोगाच्या उपाध्यक्षा माजी आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांनी केले होते. यावेळी मेधा कुलकर्णी यांनी राज्यपाल यांचा पुणेरी पगडी, उपरणे आणि सन्मानचिन्ह देवून सत्कार केला. कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ही रॅली काढण्यात आली याला पुणेकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडे दाखवून शुभारंभ करण्यात आला.

पर्यावरण संरक्षणासाठी हातभार

या प्रसंगी बोलताना कोश्यारी म्हणाले, की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी योग दिवस साजरा करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देश विदेशातील नागरिकांनी प्रतिसाद देत योग दिवस साजरा केला. सायकलचा दैनंदिन जीवनात वापर निरामय जीवन जगण्यासाठी उपयुक्त ठरण्यासोबत पर्यावरण संरक्षणासाठी हातभार लागतो.

या प्रसंगी बोलताना प्रा. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, की पुणे हे सायकलिंचे शहर म्हणून ओळखले जाते. शहरात मोठ्या प्रमाणात सायकल प्रेमी आहेत. पुणे शहर पर्यावरणपूरक व्हावे, शहराचा शाश्वत विकास व्हावा, महिला सुरक्षित रहाव्यात, या प्रेरणेने या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते फिटनेस जगतातील दिग्गज असणारे आयर्न मॅन कौस्तुभ राडकर, सायकलपटू सुनीता नाडगीर, एकादशी कोल्हटकर, निरुपमा भावे, जुगल राठी, निलेश मिसाळ,

योग प्रशिक्षक आरती चव्हाण, आयर्नमॅन मेघ ठकार आणि आयोजकांचा सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेत लहान मुले, तरुण आणि वयोवृद्ध पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. छ. शिवाजी महाराज पुतळा ते झाशीचा राणी पुतळा या दरम्यान ‘पुणे ऑन पेडल्स सायकल रॅली’चे आयोजन केले होते. सहभाग घेतलेल्या सर्वांना टी शर्ट, गॉगल, मास्क, मेडल आणि प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची सुवर्ण कामगिरी

swarit

आचरेकर सरांनी मला जगायला शिकविले !

News Desk

Kargil Vijay Diwas : मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘या’ २ संघात रंगणार फुटबॉल सामना

News Desk