HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र राजकारण

मुंबईसह राज्यासमोर आता चक्रीवादळाचे संकट

मुंबई | राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना दुसरीकडे आता मुंबईसह राज्यासमोर नैसर्गिक आपत्तीचे संकट उभे राहिले आहे. मुंबईसह राज्यावर आता चक्रीवादळाचा धोका घोंघावू लागला आहे. येत्या ३ जून रोजी हे चक्रीवादळ पश्चिम किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता असून रायगडमधील हरिहरेश्वरपासून ते दमणपर्यतच्या पट्ट्यात या चक्रीवादळाचा परिणाम दिसून येणार असल्याची माहिती मिळते. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून त्याची तीव्रता वाढल्याने आता येत्या २४ तासांत यामुळे चक्रीवादळाचा धोका असल्याचे म्हटले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एनडीआरफच्या एकूण ९ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ३ तुकड्या मुंबई, २ पालघर, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी १ तुकडी सज्ज ठेवण्यात आली आहे.

कुलाबा वेधशाळेच्या अंदाजानुसार, ३ जूनपर्यंतच्या या काही दिवसांमध्ये मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, मुंबईत ९० किमी इतक्या वेगाने वारे वाहण्याचा देखील अंदाज वर्तवण्यात आला आहे. एकीकडे कोरोना आणि दुसरीकडे मुंबईसह राज्यासमोर उभे ठाकलेले हे नैसर्गिक संकट आता मोठे आव्हान आहे. ३ जूनच्या संध्याकाळी किंवा रात्री या चक्रीवादळाचा परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर कोकणात ठाणे, मुंबई, रायगड आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार किंवा अतिमुसळधार स्वरुपाचा पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Related posts

अर्ध्या तासात शरद पवारांनी उभारला कोटींचा निधी

News Desk

आमिर खान मतदान केलाच नाही

News Desk

लाचारी माझ्या रक्तात नाही, माझ्या वडिलांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला !

News Desk