HW News Marathi
Covid-19

पाथरूडमधील भाऊराव काटे शाळेतील ६ विद्यार्थींना कोरोनाची लागण

उस्मानाबाद | भूम तालुक्यातील पाथरूड येथील भाऊराव काटे या शाळेतील ६ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या प्रकरणानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी शाळा १४ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. भूम तालुक्यातील पाथरूड येथील भाऊराव काटे शाळेत पाथरूडच्या आसपासच्या गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात पाथर्डी पासून काही अंतरावर असलेल्या जयवंतनगर येथील एका नववीच्या विद्यार्थ्याला अचानक ताप आणि सर्दीचा त्रास सुरू झाला होता.

त्यानंतर त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी त्याला पाथरूड आरोग्य केंद्रात येऊन कोरोनाची टेस्ट केली असता. त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याची हिस्ट्री तपासले असता सदरील विद्यार्थी आजारी असतानाही रोज शाळेत येत होता. या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉक्टरांनी तातडीने मुख्याध्यापक नायकींदे यांच्याशी संपर्क करून माहिती दिली. त्यानुसार, नववीच्या वर्गातील सर्व ५५ विद्यार्थ्यांची कोरोना टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि काल (५ जानेवारी)  सर्वांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली.

यापैकी आणखी ५ विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान आरोग्य विभागाने ही बाब मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता यांच्या समोर मांडत आज त्यांनी शाळा चौदा दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले त्यानुसार गटशिक्षणाधिकारी  सुनील गायकवाड यांनी संबंधित शाळेला तसे आदेश दिले आहेत त्यानुसार 14 दिवस बंद असणार आहे..

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त 12 आमदारांबाबत निर्णय कधी घेणार आहात ?”

News Desk

पुण्यात आयटी कंपन्या होणार सुरू

News Desk

जगात कोरोनाची लस घेणाऱ्या पहिल्या पुरुषाचा झाला मृत्यू

News Desk