HW News Marathi
महाराष्ट्र

धारावीत सिलिंडर स्फोट, 5 जणांची प्रकृती गंभीर, तर 14 जण होरपळले!

मुंबई। धारावीत गॅस सिलिंडर स्फोटात 15 जण होरपळले आहेत. त्यापैकी 10 जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेत तीन जणांचे चेहरे भाजले असून त्यात एका 8 वर्षाच्या मुलाचाही समावेश आहे. धारावी-माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी 12.28च्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिन आइणइ एका जेटीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली

धारावी-माटुंग्याच्या दरम्यान असलेल्या शाहू नगरातील कमला नगरमध्ये ही घटना घडली. धारावीच्या मुबारक हॉटेलच्या बाजूलाच कमला नगर आहे. दुपारी 12.28च्या सुमारास एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन फायर इंजिन आइणइ एका जेटीच्या सहाय्याने आग विझवली. त्यानंतर आगीत होरपळलेल्यांना तात्काळ बाहेर काढून त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

दुर्घटनेत दोन जण 50-60 टक्के होरपळले

एकूण 15 जणांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी 10 जण किरकोळ भाजले आहेत. तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. हे दोघे 50-60 टक्के भाजल्याचं त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टर डॉ. सायली यांनी सांगितलं.या दुर्घटनेत दोन जण 50-60 टक्के होरपळले आहेत. तसेच तीन जणांचे चेहरे भाजले आहेत. यात एका आठ वर्षीय मुलाचाही समावेश आहे. गंभीर भाजलेल्या या पाचही जणांमध्ये 8 ते 58 वर्षीय व्यक्तींचा समावेश आहे.

महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर किशोरी पेडणेकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. महापौर पेडणेकर घटनेची माहिती घेण्यासाठी घटनास्थळाकडे रवाना झाल्याचं सूत्रांनी सांगितलं. धारावीमध्ये खूप दाटीवाटीचा परिसर आणि निमुळत्या गल्ल्याचां परिसर असल्यामुळे हा सिलेंडरचा स्फोट आजूबाजूच्या दोन ते तीन घरांपर्यंत पसरलेला आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान आणि आणि स्थानिक पोलिस दाखल झालेले आहेत. संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात आलं आहे. नुकसान झालेल्या घरांची माहिती घेतली जात असून सध्या पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-पुण्‍यातील विद्यापीठांचे जेएनयु करायचे आहे काय? आशिष शेलारांचा सवाल

Aprna

राज्य आणि केंद्र सरकारचा एफआरपीचे तुकडे पाडण्याचा घाट ?

News Desk

अनिल देशमुखांच्या मागे ‘सीबीआय’चा सपाटा; मुंबई, पुण्यासह १२ ठिकाणी धाडी

News Desk