HW News Marathi
देश / विदेश

कोल्हापूर-सांगलीमधील महापुरामुळे मुंबईसह ठाण्यातील दंहीहडी रद्द

मुंबई। देशभरातसह राज्यात आज (२४ ऑगस्ट) श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. मथुरेसह मुंबईतील ठिक ठिकाणी दहीहंड्या पाहायला मिळतात. परंतु यंदा महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली भागात आलेल्या महापुरामुळे मुंबईतील छोट्या-मोठ्या तब्बल ७० टक्के आयोजकांनी आपल्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील गिरगाव, लालबाग, परळ, काळाचौकी, दादर, माहीम, वरळीसह उपनगरांत घाटकोपर, बोरिवलीसह अनेक ठिकाणी मोठ्या रकमेच्या हंड्या लावण्यात येतात. मात्र या भागातील जवळजवळ सर्वच मोठ्या हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

वरळीच्या जांबोरी मैदानातील हंडी ही गोविंदासाठी पर्वणीच असते. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागातही आमदार सुनिल शिंदे, सचिन अहिर यांच्या हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. बोरिवलीतील आमदार प्रकाश सुर्वे यांचीही दहीहंडी यंदा रद्द करण्यात आली आहे. सांगली, कोल्हापूर भागात आलेल्या महापूराने उद्वस्त झालेल्या कुटुंबीयांना पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी हंडीच्या आयोजनावर होणारा खर्च टाळून तो पूरग्रस्तांनामदत म्हणून अगोदरच पाठवला असल्याने यावेळी हंडी रद्द करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

पश्चिम उपनगरात आमदार प्रकाश सुर्वे यांची हंडी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरते. सेलिब्रेटींच्या उपस्थितीमुळे इथे दरवर्षी मोठी गर्दी होत असते. पण यंदा ही हंडी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी यंदा धान्य, फिनेलच्या बॉटल तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू पूरग्रस्त भागात पाठवण्यात आल्याची माहिती सुर्वे यांनी दिली. ठाण्यातील टेंभी नाका, वर्तनकनगरमधील संस्कृती प्रतिष्ठान, रघुनाथ नगरमधील संकल्प प्रतिष्ठान, हिरानंदानी मेडोजमधील समर्थ प्रतिष्ठान आणि मनसेच्या नौपाड्यातील दहीहंडी यंदा पारंपरिक पद्धतीने साजरी होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…आणि बाळासाहेबांच्या आशिर्वादाने भागवत कराड महापौर झाले”, गडकरींनी सांगितला किस्सा

News Desk

जगात कच्चा तेलाच्या किंमतीत ऐतिहासिक घसरण

News Desk

श्नीनगर-जम्मू महामार्गावर बनिहाल येथे कारमध्ये स्फोट

News Desk