HW News Marathi
महाराष्ट्र

यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात न होता ‘या’ ठिकाणी होणार…

मुंबई | राज्यातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याची परंपरा यंदा खंडित होणार आहे. शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क इथल्या स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत दिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर शिवसेनेचा हा पहिलाच दसरा मेळावा असणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांवर अद्यापही बंधने कायम आहेत. त्यामुळे शिवसेनेचा शिवतीर्थावरील दसरा मेळावा आता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही प्रमाणात अनलॉक केलं असलं तरी सार्वजनिक कार्यक्रमांवरील निर्बंध अद्याप उठवलेले नाहीत. त्यामुळं सण-उत्सव साजरे करण्यावर अजूनही बंधनं कायम आहेत. त्यापार्श्वभूमीवर शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपीठावरच होणार अशी भूमिका संजय राऊत यांनी मांडली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज ठाकरे आज मुंबईतील सभेतून प्रचाराचा नारळ फोडणार

News Desk

परमबीर सिंग यांना ९ जूनपर्यंत अटक न करण्याचे राज्य सरकारचे उच्च न्यायालयाला आश्वासन

News Desk

“राजे एकत्र आले याचा आनंदच, त्यांनी ओबीसींसाठीही प्रयत्न करावे”, वडेट्टीवारांची अपेक्षा

News Desk