HW News Marathi
महाराष्ट्र

दसऱ्यानंतर राज्य मंत्रिमंडळ विस्तार ?

औरंगाबाद- केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद येथे दिले आहेत. नवरात्र उत्सवानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असून त्यात काही बड्या नेत्यांचा समावेश केला जाणार असल्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नारायण राणे यांचादेखील यात समावेश होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी खुद्द नारायण राणे यांनीच नवरात्रीनंतर भाजपत प्रवेश करण्याचे संकेत दिले होते. त्यांच्या या इशाऱ्यानंतर कॉँग्रेसने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नारायण राणे यांना पाठिंबा देणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांकडील पदे काढून घेतली आहेत. त्यामुळे राणे भाजपमध्ये दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, राणेसोबत इतर पक्षातून आलेल्या काहींना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. सध्या वादात सापडलेल्या मंत्र्यांना डच्चु दिला जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मतं मागायला आल्यावर पायतान घेऊन उभे रहा”, पडळकरांचा सल्ला

News Desk

नितेश राणेंसह १८ कार्यकर्त्यांना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी

News Desk

जावेद अख्तर यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

News Desk