HW News Marathi
महाराष्ट्र

“साधेपणानं कार्यक्रम कर असं सांगितलं होतं पण…”,अजितदादांनी टोचले आमदाराचे कान

नाशिक | कोरोनाच्या कठीण काळात नियमांचं पालन करा असं सरकार वारंवार सांगत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं, मास्क लावणं या बाबी काटेकोरपणे पाळताना दिसतात. अशात आज (१ जूलै) नाशिकमध्ये भूमिपूजनच्या कार्यक्रमाला गेले असता राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिर यांचे त्यांनी कान टोचले आहेत. “साधेपणाने कार्यक्रम कर, असं मी सरोज आहेर यांना सांगितलं होतं. नारळ फोडायचा आणि गाडीत बसायचं, असं सरोज म्हणाली. पण इथे किती नारळ आहेत बघा” असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचे कान टोचले. अजित पवारांनी नाशिक दौऱ्यात रस्ते निर्मितीच्या कामांचं भूमिपूजन केलं.

“आम्हीच नियम बनवायचे, मग पाळलेही पाहिजेत”

नाशिकमधील देवळाली विधानसभा मतदारसंघात ५१ कोटी रुपयांच्या रस्ते निर्मिती कामांचं भूमिपूजन करुन अजित पवार यांनी कुदळ मारली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह आमदार सरोज अहिरे, दिलीप बनकर आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. “आम्हीच नियम बनवायचे, मग आम्ही नियम पाळले पाहिजेत. न्यायालयाने मध्यंतरी विचारलं की राज्यात मोर्चे कसे काय निघात आहेत. मागच्या वेळेस सिंहस्थ झाला आणि कोरोना वाढला.” याकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं.

“सरोज अहिरेंचा उल्लेख विकास म्हणून कन्या करा”

“कोरोना काळात डॉक्टर, नर्स जीवाची पर्वा न करता काम करत आहेत. आमदार सरोज अहिरे यांचे पती देखील डॉक्टर आहेत. त्यांना देखील डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा. सरोज अहिरे यांच्या कामाचा उत्साह मी पाहतो आहे. पत्रकारांना विनंती आहे, आमदार सरोज अहिरे यांचा उल्लेख यापुढे विकास कन्या म्हणून करा.” असंही अजित पवार म्हणाले. “गावच्या सरपंचालाच सिक्युरिटीने अडवलं. ज्याला मान सन्मान दिला पाहिजे, त्यांची काही वेळेस अडचण होते. ज्याला येता आलं नाही त्यांची माफी मागतो.” असं म्हणत कार्यक्रमाला उपस्थित राहता न आलेल्यांची अजितदादांनी माफी मागितली.

“केंद्राचं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष”

“पवार साहेब 50 वर्षांपासून जनतेत आहेत. आज आपण कृषी दिन साजरा करतो आहोत. पण केंद्राविरोधात 7 महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार त्यांच्याकडे ढुंकून बघायला तयार नाही. शेतकऱ्यांना त्रास होता कामा नये आणि शेतकऱ्यांच्या हिताचं बिल विधिमंडळात आम्ही आणणार आहोत. शेतकऱ्यांना फसवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईची देखील तरतूद आहे.” असं अजित पवारांनी सांगितलं.

“अनिल, बारामतीकडे कमी लक्ष दिलं तरी चालेल”

“मी ५ कोटी क्रीडा संकुलासाठी जाहीर करतो. अनिल, बारामतीकडे कमी लक्ष दिलं तरी चालेल पण इथे जास्त लक्ष दे” असा सल्ला

अजितदादांनी आपल्या स्वीय सहाय्यकाला दिला. “मी राज्याचा उपमुख्यमंत्री असलो तरी माझ्या मतदारसंघात मी 6 वाजता कामावर असतो. सगळे अधिकारी मला टरकून असतात” असं अजितदादा मिश्किलपणे म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साप चावल्यानं मुलीचा झोपेतच मृत्यू

News Desk

“पॉझिटिव्हीटी दर ५ टक्क्यांच्या आत राहिला तरच…”, अजित पवारांचा इशारा

News Desk

अधिवेशनादरम्यान मंत्रालयात दोन जणांनी केला आत्महत्येचा प्रयत्न

Aprna