HW News Marathi
महाराष्ट्र

DCP सौरभ त्रिपाठी अंगडिया खंडणी प्रकरणाची उद्या सत्र न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई | मुंबई पोलिसात कार्यरत असलेले झोन २ चे डिसिपी सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगडिया प्रकरणात खंडणी मागितल्याचे आरोप करण्यात आले होता. मात्र, त्यानंतर त्यांनी अटकेपासून बचाव करण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. अटकपूर्व जामीन अर्जात त्रिपाठींना, असे म्हटले होते. यापूर्वीच्या एफआयआरमध्ये त्यांचे नाव नव्हते आणि पोलीस ठाण्याच्या पातळीवर अंगडियाकडून पैसे वसूल केले जात होते याची त्यांना माहिती नव्हती.

त्रिपाठी यांच्या या याचिकेवर आज (२३ मार्च) तारखेला सुनावणी होणार होती. परंतु, या प्रकरणातील तपास अधीकारी एसीपी शशांक सांडभोर यांनी न्यायालयाकडून १ दिवसाची मुदतवाढ मागून घेतली आहे. त्यामुळे आता या याचिकेवर उद्या म्हणजे २४ मार्चला सुनावणी होणार आहे.

यापूर्वी मुंबई पोलिसांकडून त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव गृह विभागाकडे पाठवण्यात आला होता. त्यावर काल (२२ मार्च) सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वाक्षरी करून पुन्हा हा प्रस्ताव गृह खात्याकडे पाठवला. संध्याकाळी गृह विभागाने या निलंबनावर शिक्कामोर्तब केला आणि त्रिपाठींना निलंबित केल्याचे जाहीर करण्यात आले. आता निलंबनानंतर आद्य होणाऱ्या सुनावणीत नक्की काय निर्णय येणार यावर सर्वांचे लक्ष आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर भाजपचे आंदोलन

Aprna

शिवसेनेबाबत विचारलेल्या प्रश्नाला नारायण राणेंनी दिलं जबरदस्त उत्तर

Ruchita Chowdhary

लॉकडाऊनचा निर्णय अन्यायकारक,अजित पवारांच्या सूचनेनुसार घाट, विखेंचा आरोप!

News Desk