HW News Marathi
महाराष्ट्र

“…दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी”, फडणवीस-राऊतांच्या गळाभेटीवर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया

पुणे | शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा काल (३१ जानेवारी) मल्हार नार्वेकर यांच्याशी साखरपूडा पार पडला. या सोहळ्याला राजकीय वर्तृळातील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या सगळ्यात एक दृृश्य सगळ्यात गाजले ते म्हणजे राऊत-फडणवीस यांची गळाभेट. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांची गळाभेट घेतली. “शत्रूही एकमेकांची गळाभेट घेतात, दोन मित्र भेटल्यानंतर मिठी मारतात” अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.“आपल्या देशाची संस्कृती आहे, दुष्मन जरी असला तरी तो त्या जागी, एरवी आपण एकमेकांना प्रेम देतो. देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांच्या मुलीच्या साखरपुड्याला जायलाच हवं होतं” असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

राऊत-फडणवीसांची गळाभेट

देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे एकत्रच कार्यक्रमस्थळी पोहोचले. त्यावेळी मल्हार आणि पूर्वशी यांच्यासोबत नार्वेकर कुटुंबीय आणि संजय राऊत यांच्या पत्नी उपस्थित होत्या. फडणवीस आणि दरेकर यांचं आगमन झाल्यानंतर राजेश नार्वेकर यांनी फडणवीसांना नमस्कार केला. फडणवीसांनी पुढे होऊन मल्हार आणि पूर्वशी यांना पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. त्यावेळी दुसरीकडे असलेल्या संजय राऊत यांनी फडणवीसांना पाहिलं आणि ते फडणवीसांकडे आले. दोघेही समोरासमोर आल्यानंतर राऊत यांनी फडणवीसांची गळाभेट घेतली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मुंडे साहेबांना तर शपथही घेता आली नव्हती”, पंकजा मुंडे पत्रकार परिषदेत झाल्या भावुक!

News Desk

रस्त्यांच्या माध्यमातून विकास वेगाने पूर्णत्वाला | एकनाथ शिंदे

News Desk

सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना मोठा दिलासा, चौकशी तूर्तास बंद

News Desk