HW News Marathi
महाराष्ट्र

भूम तहसिल कार्यालयाच्या महसूल पथकावर वाळू माफियाचा जीवघेणा हल्ला; तलाठी व मंडळ अधिकारी जखमी 

भुम/उस्मानाबाद । भूम तालुक्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार तहसिलदार भूम यांनी अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक प्रतिबंधक पथक तयार केले आहे. सदर पथक तहसिलदार भूम यांच्या समवेत शनिवारी (२७ नोव्हेंबर) मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास मौजे चिंचपूर येथील नदीपात्रात उतरले असता त्याठिकाणी एक वाळूने भरलेले टिप्पर अवैध वाळू उत्खनन व वाहतूक करताना सापडले

नेमकं काय घडलं?

तहसिलदार भूम यांना भूम लगतच्या नदी पात्रात वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर नदी पात्रात वाळू चाळत असल्याची बातमी मिळाल्याने मौजे चिंचपूर येथील कार्यवाही पूर्ण करून ते भूम नदीपात्रात उतरले असता. महसूल पथकाची चाहूल वाळूमाफियाला लागली. त्या ठिकाणी वाळू चाळत असलेल्या ट्रकटरला थांबवण्याचा प्रयत्न तहसिलदार भूम यांनी केला असता वाळू माफीयाने तसाच ट्रॅक्टर पुढे पळवला. महसूल पथकाने त्याचा पाठलाग सुरु केला असता. त्याने ट्रॅक्टर पाणंद रस्त्याने शिवरस्त्याने पळवत भूम चिंचपूर रोडवर आणला.
महसूल पथकातील काही तलाठी व मंडळ अधिकारी दुचाकीवर स्वार होऊन सदर ट्रॅक्टरचा पाठलाग करत होते त्यांनी सदर ट्रॅक्टरला ओव्हरटेक करून थांबण्याचा प्रयत्न केला असता वाळू माफियाने तो ट्रॅक्टर सरळ तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अंगावर घातला. यावरच तो थांबला नसून तो तेथून पळाला हा थरार अंदाजे ४६ मिनिटे चालला. शेवटी २० किलोमीटर पुढे जाऊन वाळु माफीयाने चिंचपूर शिवारात एका गवताळ बांधावर ट्रॅक्टर नेऊन पलटी केला आणि तिथून माफीया पसार झाला. या घटनेत तलाठी लक्ष्मण कांबळे व मंडळ अधिकारी शिवाजी पाटील हे जखमी झाले. त्यांना भूम ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
सदर ट्रॅक्टर जप्त करून पोलीस ठाणे भूम येथे लावण्यात आला आहे. मौजे चिंचपूर येथे जप्त केलेला टिप्परही पोलीस ठाणे भूम येथे लावला आहे. सदरची कार्यवाही जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शानाखाली तहसिलदार भूम यांच्या पथकाने केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“….तर त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?” रामदास आठवलेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल!

News Desk

‘दुल्हन हम ले जायेंगे’ म्हणत IT विभागाने काढली वरात; जालन्यात कोट्यवधींचं घबाड जप्त

Manasi Devkar

विहंग सरनाईक चौकशीसाठी ईडीच्या ताब्यात

News Desk