HW News Marathi
क्राइम

शाहरुख खानची मॅनेजर आणि गोसावी यांच्यात आर्यन प्रकरणासंबंधी पैशांची देवाणघेवाण ?

मुंबई | आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानी हिचं एक सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबई क्रूझ ड्रग्ज आणि आर्यन खान प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आल्याचं दिसत आहे. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानची अटक रोखण्यासाठी कथितरित्या पैशांची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर येत आहे.

ह्या प्रकरणात शाहरुख खानची मॅनेजर पूजा ददलानीचा लोअर परळ मधला मर्सिडीज कारचं सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांतर्फे गठित एसआयटी टीमच्या हाती लागलं आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात येणाऱ्या काळात अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

किरण गोसावीने पूजा ददलानीला मदत करण्याचं आश्वासन दिलं

या प्रकरणात किरण गोसावीने पूजा ददलानीला मदत करण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र जर हे खरं असेल तर किरण गोसावीच्या विरोधात एसआयटी टीम खंडणीचा गुन्हा नोंदवण्याची शक्यता आहे. यापूर्वी गोसावीवर दोन गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणाची भांडाफोड प्रभाकर साईल याने आपल्या शपथपत्राच्या माध्यमातून केली होती.

लोअर परळमध्ये आर्थिक डीलविषयी ३ ऑक्टोबर रोजी भेट

किरण गोसावी आणि पूजा ददलानी यांच्यात डील झाल्याचा दावा पंच प्रभाकर साईलने केला होता. सॅम डिसोझा, पूजा ददलानी आणि गोसावी यांची लोअर परळमध्ये आर्थिक डीलविषयी ३ ऑक्टोबर रोजी भेट झाली होती, असंही पंच प्रभाकर साईलने सांगितलं होतं. साईलच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्या रात्री गोसावीला त्याच्या वाशी येथील घरी सोडले. त्यानंतर गोसावीने साईलला ताडदेवच्या एका हॉटेलच्या बाहेरुन पैसे आणायला सांगितले होते. त्यामुळे आता प्रभाकर साईल जे सांगत होता त्यात काहीतरी तथ्य असल्याचा कुठेतरी अंदाज व्यक्त केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर-चंद्रपूर महामार्गावर जनावरांची तस्करी करणाऱ्या गाडीने पोलिसाला चिरडले

News Desk

केईएम रुग्णालयातील फिजीओथेरपीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

News Desk

विनयभंग प्रकरणी ३ वर्षाची शिक्षा

News Desk