HW News Marathi
महाराष्ट्र

आॅक्सिजन अभावी जवानाचा मृत्यू

उत्तम बाबळे

नांदेड :- भोकरचे भूमीपुत्र तथा भारतीय इंडो तिबेटियन बाॅर्डर सुरक्षा दलाचे जवान नरसिंग जिल्लेवाड यांचा दि.२२ आॅगस्ट रोजी चिन सिमेवर कर्तव्य बजावतांना शरीर अस्वास्तव्य व आॅक्सिजनच्या अत्यल्प पुरवठ्यामुळे ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला असून २६ आॅगस्ट रोजी भोकर येथे त्यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. ही बातमी कळताच तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

प्रफुल्लनगर,भोकर येथील रहिवासी असलेल्या एका गरीब कुटूंबात जन्म झालेले नरसिंग शिवाजी जिल्लेवाड यांनी आपल्या कुटूंबीयांच्या बिकट आर्थीक परिस्थितीत जि.प.हायस्कूल भोकर येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पुर्ण केले.महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची इच्छा असताना बालपणीच पित्याचे छत्र हरपल्याने कुटूंबीयांच्या गरजा भागविण्याची जबाबदारी त्यांच्यावर पडले. पुढील शिक्षण पुर्ण करु शकले नाहीत व त्यांनी सन १९९६ मध्ये देशसेवचे व्रत्त घेऊन भारतीय इंडो तिबेटियन बाॅर्डर सुरक्षा दलात ते भरती झाले.अरुणाचल प्रदेश मधील किकीन मुख्यालयी पत्नी,३ मुले व १ मुलगी यांच्या सोबत राहून ते चिन सिमेवर सद्या कर्तव्य बजावत होते.दरम्यान कर्तव्य बजावत असतांना २२ आॅगस्ट २०१७ रोजी अचानकपणे त्यांना शारीरीक थकवा आला व बर्फाच्छादित वातावरणात आॅक्सीजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे जवान नरसिंग जिल्लेवाड यांचा ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला.याबाबतची माहीती त्यांच्यासोबत कर्तव्यावर असलेल्या जवानांनी गुहाटी मुख्यालयात रेडीओ वाॅकीटाॅकी वरुन वरीष्ठ अधिका-यांना दिली व अधिका-यांनी त्यांच्या पत्नींना किकीन येथे दिली.शहीद जवान नरसिंग जिल्लेवाड यांचे पार्थीव २५ आॅगस्ट रोजी सकाळी गुहाटी मुख्यालयी येणार असून तेथून विमानाने हैद्राबाद (तेलंगणा राज्य )येथे आणण्यात येणार आहे व रात्री घरी भोकर येथे पोहचणार आहे. २६ आॅगस्ट रोजी सकाळी ७:०० वाजता व्यंकटेश टाॅकीज मैदान,भोकर येथे त्यांचे पार्थीव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून शासकिय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात वृद्ध आई,बहिण,पत्नी,३ मुले व एक मुलगी असा परिवार आहे.भोकर उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे,तहसिलदार व्यंकटेश मुंडे,पो.नि.आर.एस.पडवळ यांनी या माहितीस दुजोरा दिला असून अंत्यसंस्कार शासकिय इतमामात होणार असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.शहीद जवान नरसिंग जिल्लेवाड यांची भोकर येथे २० दिवसापुर्वीच कुटूंबीयांची झाली शेवटची भेट.

कुटूंबात एकुलते एक मुलगा असलेले शहीद जवान नरसिंग जिल्लेवाड यांनी गेल्या २० दिवसापुर्वीच भोकर येथे येऊन बहिणीकडे राहत असलेल्या वृद्ध आईस,बहिणीस व मित्रपरिवाराची भेट घेतली होती.यावेळी नगरसेवक शे.वकील शे.खैराती यांच्या संपर्क कार्यालयात येऊन त्यांनी संपादक उत्तम बाबळे,माजी नगरसेवक जवाजोद्दीन बरबडेकर व नगरसेवक शे.वकील शे.खैराती यांची भेट घेतली आणि झालेल्या चर्चेत भारत – चिन सिमेवरील चिनच्या वाढत्या तणावपुर्ण कारवायांविषयी सांगीतले.तसेच माझी सुट्टी संपली नाही परंतू चिनच्या त्या कारवायांना पाहून आम्हाला तात्काळ कर्तव्यावर परत बोलावले असल्याचे त्यांनी सांगीतले. कुटूंबीय व आमची ही त्यांच्याशी झालेली शेवटची तथा अविस्मरणीय भेट होती आणि त्यांच्या मृत्यूची बातमी मिळाल्याने आमच्यासह तालुक्यातील अनेकांचे मन पार हेलाऊन गेले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हेलिकॉप्टरमुळे लोकसभेचं तिकीट गेलं! सुजय विखेंच्या या आरोपात तथ्य नाही,राष्ट्रवादीने दिले उत्तर

News Desk

काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक!

News Desk

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेते पदी निवड

News Desk