HW News Marathi
महाराष्ट्र

भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकीचे बॉम्बने उडवून देण्याची धमकी

मुंबई | भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. जामनेर येथे काल (१३ ऑक्टोबर) एका कार्यक्रमादरम्यान महाजन यांच्या स्वीय सहाय्यकाला धमकीचा फोन आला होता. भाजप नेते आशिष शेलार यांनाही काल रात्री दहा वेळा धमकीचे फोन आले होते. गिरीश महाजन यांच्या जी. एम. फाउंडेशनतर्फे ग्लोबल हॉस्पिटलचे काल जामनेर येथे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात महाजन याचे स्वीय सहाय्यक दीपक तायडे यांना एक फोन आला होता. यामध्ये गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये देण्यास सांग अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली. काही वेळानंतर त्यांच्या मोबाईलवर धमकी देणाऱ्या व्यक्तीने मेसेजही केला होता आणि त्यात संध्याकाळी पाच वाजता स्फोट घडवून आणण्याची धमकी दिली. जामनेर पोलिसांमध्ये अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कालच भाजपाचे मुंबईतील नेते आशिष शेलार यांनाही दहा धमकीचे फोन आले होते. या फोन करणाऱ्यांना पोलिसांनी आज मुंब्र्यातून अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, शिवसेनेचे खसदार संजय राऊत आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमक्यांचे फोन आले होते. या नेत्यांना धमकी देणाऱ्याला पोलिसांनी कोलकात्यातून अटक केली होती, तो दाऊदचा हस्तक असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे सत्ताधारी नेत्यांना आणि विरोधी पक्षातील नेत्यांना धमकीचे फोन येण्याची प्रकरणे वाढू लागली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राचा निर्णय महाराष्ट्रातच होईल, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार !

News Desk

“…नाहीतर या देशात फक्त मुडद्यांचं राज्य राहिलं”, संजय राऊतांचा गंभीर इशारा

News Desk

सचिन वाझे प्रकरणाचा सरकारला कोणताही धोका नाही, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचं विधान

News Desk