HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे-बंगळुरु महार्गावर खासगी बस-ट्रकमध्ये भीषण आपघात, ६ जण जागीच ठार

सातारा | साताऱ्यात पुणे-बंगळुरु महार्गावरील डी मार्टसमोर एका खासगी बसने ट्रकला धडक दिली. हा अपघात आज (१२ सप्टेंबर) पहाटे साडेपाट वाजताच्या सुमारास झाला. अपघात इतका भीषण होता की, त्यात बसमधील ६ प्रवासी जागीच ठार झाले असून २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.

सातारा शहराजवळच्या खंडेवाडीजवळून जात असताना ट्रकचे टायर फुटले. ट्रकचालकाने ट्रकवर निंयत्रण मिळवत ट्रक जागीच थांबवला. त्याचवेळी एक ट्रॅव्हल्स ट्रकमागून भरदाव वेगाने येत होती. ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबवल्यामुळे ट्रॅव्हल्स ट्रकला पाठीमागून धडकली. या बसमधून प्रवास करणारी प्रवासी कर्नाटकमधील असल्याची माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ’,मंदाकिनी खडसेंनाही ईडीकडून समन्स!

News Desk

पूराने धोका निर्माण झालेल्या नद्यांमधील जलसंपदा विभागाची गाळ उपसा मोहीम: जलसंपदा मंत्र्यांची चिपळूणमधील पाहणी

Aprna

राज्याभरात आजपासून प्लास्टिक बंदी

News Desk