HW News Marathi
महाराष्ट्र

‘माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ’,मंदाकिनी खडसेंनाही ईडीकडून समन्स!

मुंबई। पुण्यातील भोसरी भूखंड प्रकरणी राष्ट्रवादी नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नीला ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना बुधवारी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी खडसें यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांची ८ जुलै रोजी ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. यानंतर मंदाकिनी खडसे यांना समन्स बजावण्यात आले होते मात्र मंदाकिनी खडसे यांनी ईडीकडे वेळ मागितली होती. आता मंदाकिनी खडसे चौकशीसाठी हजर राहणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठा

भूखंड प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना ईडीने पुन्हा समन्स बजावले आहेत. यापुर्वीही मंदाकिनी खडसे यांना नोटीस बजावण्यात आली होती. मात्र चौकशीसाठी हजर राहण्यासाठी टाळाटाळ केली. तसेच ईडीकडे पत्राद्वारे चौकशीस हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. मंदाकिनी खडसे यांना बुधवार १८ ऑगस्टरोजी सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई खासगी साखर कारखान्याला कर्जपुरवठा करण्यासह बँकेतील आर्थिक व्यवहारासंबंधात ईडीने माहिती मागितली होती.

नेमकं प्रकरण काय?

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भोसरी भूखंड एकनाथ खडसे यांनी खरेदी केला होता. एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना भोसरी भूखंड हा पत्नी मंदाकिनी खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी ३ कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केली होती. सर्वे क्रमांक ५२ मधील ३ एकर जागा त्यांनी खरेदी केली. जमिनीची स्टॅम्प ड्युटी म्हणून १ कोटी ३७ लाख रुपयेही भरण्यात आले. सदर जमीन एमआयडीसीच्या मालकीची आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना नेत्याच्या मुलाच्या लग्नात 2000 जणांनी एकत्र येत कोरोना नियमांची केली  पायमल्ली!

News Desk

चवदार तळे ऊर्जा स्रोतच! – जितेंद्र आव्हाड

Aprna

आजच्या हिवाळी अधिवेशनात ६ अध्यादेश, १० विधेयके मांडणार

News Desk