मुंबई | काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या महाआगाडीने आज (७ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ‘शपथनामा’ जाहीर केला आहे. महाआघाडीच्या जाहीरनाम्यात उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या प्रमुख सात मुद्यांवर भर देण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार सुप्रिया सुळे, अनिल गोटे, एकनाथ गायकवाड उपस्थित आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
उद्योग, शेती, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि नियोजनबद्ध शहरीकरण या प्रमुख सात मुद्यांवर भर असणारा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचा #शपथनामा प्रकाशीत! #Shapathnama pic.twitter.com/fe6hP19KVT
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) October 7, 2019
महाआघाडीच्या शपथनाम्यात अंतर्भाव करत बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्यात येणार असून स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के स्थान देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पावले उचलत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात येईल, असे आश्वासनही महाआघाडीने दिले आहे.
महाआघाडी शपथनाम्यामधील महत्त्वाचे मुद्दे
- शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी
- सुशिक्षित बेरोजगारांना पाच हजार रुपये मासिक भत्ता
- शासकीय आणि अनुदानित महाविद्यालयात विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण
- उच्च शिक्षणासाठी शून्य टक्के व्याजदराने शिक्षण कर्ज
- राज्यातील प्रत्येक नागरिकाला आरोग्य विमा
- कामगारांना किमान २१ हजार वेतन
- स्वतंत्र मराठी भाषा विद्यापीठ
- सर्व महापालिका हद्दीतील ५०० चौरस फूट घरांना मालमत्ता करमाफी
- ८० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या देण्यासाठी विशेष कायदा करणार
- ठिबक आणि तुषार सिंचनासाठी १०० टक्के अनुदान देणार
- केजी टू पीजी मोफत शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी पहिल्या टप्यात शासकीय आणि अनुदानीत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणार
- दुधाला उत्पादन खर्चावर आधारित भाव
- जात पडताळणी प्रक्रियेत सुटसुटीतपणा आणणार
- विदर्भ,मराठवाडा,उत्तर महाराष्ट्र,कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील मागास तालुक्यात उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी स्वतंत्र धोरण आखणार
- निम अंतर्गत कामगारांना पूर्णवेळ कामगारांचा दर्जा देणार
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.