HW News Marathi
महाराष्ट्र

आंतरजातीय विवाह केल्यास जीवे मारण्याची धमकी, मुलीची आई-वडिलांविरोधात न्यायालयात धाव

मुंबई | आई-वडिलांनी मुलीला आंतरजातीय विवाह केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकार समोर आला आहे. याविरोधात मुलीला पोलिसांकडून मदत मिळत नसल्याने सरळ मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्ता प्रियांका शेटे (१९) असे या तरुणीचे नाव असून आंतरजातीय प्रेमकरणाला घरातून विरोध असून तिला आणि तिच्या प्रियकराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

प्रियंका गेल्या तीन वर्षापासून प्रेमसंबंध आहे.या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला तिच्या आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा विरोध आहे. लग्न केले तर नातेवाईकांकडून आपल्या आणि प्रियकराच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती प्रियंकाने या याचिकेत व्यक्त केली आहे. या प्रकरणी घरच्यांच्या त्रासाला कंटाळून प्रियंकाने एकदा आत्महत्येचा प्रयत्नही केला आहे.

पुण्यातील तळेगावानजीक नवलाख उंबरे या गावात राहणारी प्रियंकाने तिच्या प्रियकराचा जीव वाचवण्याची मागणी करत ॲड. नितीन सातपुते यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली आहे. तरुणीचे दुसऱ्या जातीतील एका युवकावर प्रेम आहे. विराज अवघडे हा मातंग समाजातील असल्याने या प्रेमसंबंधांना आणि लग्नाला तिच्या आई-वडिलांचा आणि नातेवाईकांचा विरोध आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दोन शिवसैनिकांची भेट’, भेटीनंतर अमोल कोल्हे म्हणाले…..

Jui Jadhav

“समीर वानखेडेंविरोधात तक्रार दाखल करा”, ज्येष्ठ वकिलाची पोलिसांकडे तक्रार

News Desk

राष्ट्रवादीची कोणतीही जबाबदारी प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही!, राष्ट्रवादीने दिले स्पष्टीकरण

News Desk