HW News Marathi
महाराष्ट्र

‘म्याव म्याव’ करणारे लपून बसलेत, दीपक केसरकर यांचे नितेश राणेंवर टीकास्त्र

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्या प्रकरणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, त्या आधीच नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी सिंधुदुर्ग सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. यातच शिवसेना नेते आणि माजी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनीही आता नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. विधानसभेच्या पायऱ्यावर बसून मांजराची नक्कल करणारे आज स्वतःच मांजरासारखे लपून बसले आहेत, अशी टीका केसरकर यांनी नितेश राणे यांच्यावर केली आहे.

नितेश राणे हे सोमवारपासून अज्ञातवासात आहेत. त्यावरून दीपक केसरकर यांनी नितेश राणेंना टोला लगावला आहे. सिंधुदुर्गात प्रसार माध्यमांशी बोलत असताना केसरकर म्हणाले, “नितेश राणे विधानसभेच्या पायऱ्यांवर बसून मांजराचा आवाज काढत होते आणि आज ते वाघाला किंवा न्यायालयाला घाबरून मांजरासारखे लपून बसलेले आहेत. कोणी गुन्हा केला हे मला माहिती नाही. पण, गुन्हेगार लोकं हे नेहमीच पोलिसांना आणि कायद्याला घाबरत असतात. मात्र, ‘म्याव म्याव’ करत जेव्हा दुसऱ्यांना चिडवलं जातं तेव्हा तेच करण्याची वेळ येते. म्हणून आपली वागणूक चांगली ठेवली पाहिजे, असा टोलाही त्यांनी यावेळी राणेंना लगावला आहे.

मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय होतं हे लोकांनी पाहिलंय

दीपक केसरकर यांनी लखीमपूर घटनेचा उल्लेख करत केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर देखील टीका केली आहे. नारायण राणे जर केंद्रात केंद्रीय मंत्री आहेत म्हणून आपल्या मुलाला वाचवण्याची भूमिका घेणार असतील तर उत्तर प्रदेशात काय झालं, हे आपण पाहिलं आहे. मंत्र्याच्या मुलाला वाचवताना काय उद्रेक होतो. हेसुद्धा लोकांनी पाहिलेलं आहे. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात आणि शांतताप्रिय सिंधुदुर्गात होऊ नये इतकीच आशा आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई महानगरपालिकेला माझा सलाम –  जावेद अख्तर

News Desk

महाभकास आघाडीच्या ३ चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली – चंद्रकांत पाटील

News Desk

दिल्लीतील मरकज कार्यक्रमानंतर ‘शब-ए-बरात’, आंबेडकर जयंतीसारखे सामूहिक सोहळे टाळा !

News Desk