HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या ४० वर, पुणे-मुंबईमध्ये प्रत्येकी १ रुग्ण तर एकाचा मृत्यू

पुणे | राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव पुण्यात झालेला पाहायला मिळत आहे. पुण्यात कोरोनाचा आणखी एक पोझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. हा रुग्ण पिंपरी-चिचवडचा रहिवासी आहे. यामुळे आता पुण्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होऊन १७ वर गेल्याची माहिती म्हैसकरांनी आज (१७ मार्च) पत्रकार परिषदेत घेतले आहे. गेल्या २४ तासात ३२ डिर्स्जाच देण्यात आल्या आहेत. तसेच पुण्यानंतर मुंबईतही आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. हा रुग्ण अमेरिलकेतून आला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या ४० वर केली आहे. तर देशात १३७ कोरोना ग्रस्तांची संख्या वाढली आहे. तसेच परदेशातून पुण्यात १४८ प्रवासी आली असून परदेशातून आलेल्या सर्व प्रवाशांना घरी राहण्याचे विभागीय आयुक्तांनी दिले आहेत. पुण्यात बालवाडीत विलगीकरण कक्ष उभारण्यात येणार असल्याची माहिती म्हैसेकरांनी दिली आहे. कोरोनामुळे पुण्यात ३१ मार्चपर्यंत बंद ठेवणार आहे.

मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयाता ६४ वर्षीय ज्येष्ठ नागरिकचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे राज्यात कोरोनाची संख्या ३९ वरून ३८ झाली होती. मात्र, आता राज्यातील सर्व सरकारी कार्यालये पुढील सात दिवसांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय राज्य कॅबिनेट घेतला आहे. राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेटची बैठक बोलविली आहे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या अशी आहे

  • पुणे – १७
  • मुंबई – ६, कस्तुरबा रुग्णालयात १ रुग्णाचा मृत्यू
  • नागपूर- ४
  • यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण – प्रत्येक ३,
  • रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद – प्रत्येकी १

एकूण ४० रुग्ण

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जुन्या मंत्र्यांना डच्चु, नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान

News Desk

पावसाळा लक्षात घेत छत्री, रेनकोट यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

News Desk

देशात, राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता! – जयंत पाटील

Aprna