HW News Marathi
महाराष्ट्र

मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही – दीपक म्हैसेकर

पुणे | पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर काल (१ ऑगस्ट) निवृत्त झाले. कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेताना म्हैसेकर यांनी आपले अनुभव सांगितले. याबद्दलची माहिती टीव्ही ९ मराठीने दिली आहे. त्यानी असे म्हटले की, “मला सुद्धा अनेक आजार आहेत, पण त्यामुळे मी मागे हटलो नाही. पॉझिटिव्ह आणि योग्य दक्षता घ्यावी, आज मुबलक प्रमाणात, मानसिक तयारी महत्वाची आहे”, दीपक म्हैसेकर यांनी सांगितले.

“वेगवेगळ्या विभागाचे समन्वय हे मोठे आव्हान आहे. पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात यांच्या नागरिकांत समन्वय साधणे मोठे आवाहन आहे. सध्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी सेंट्रल वाईज नियंत्रण ३ ऑगस्टपासून सुरु करत आहोत”, अशी माहिती दीपक म्हैसेकर यांनी यावेळी दिली.

“ग्रामीण भागात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा संदर्भात भाजी दूध खरेदी करताना मास्क वापरत नाही, त्यामुळे प्रसार होतो, अशा नागरिकांची आम्ही टेस्टिंग करतो. चांगले काम करत असताना राजकीय आरोप झाल्यावर आम्हाला पण वाईट वाटते. आम्ही सामान्य नागरिकांसाठी काम करतो, तर ते लोकप्रतिनिधी असतात. ते त्यांचे काम करतात, आम्ही आमचे काम करतो. मात्र, चुकीचा आरोप झाला तर दुःख हे वाटते”, असेही दीपक म्हैसेकर म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यातील शेतकऱ्यांकडे लक्ष द्या”, खासदार रक्षा खडसेंचं मुख्यमंत्र्यांऐवजी शरद पवारांना पत्र

News Desk

राष्ट्रवादीने खडसेंना समज दिली नाही तर पदवीधर निवडणुकीत ब्राम्हण समाज मतदान करणार नाही – आनंद दवे

News Desk

केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर घटना दुरुस्ती करुन राज्याला अधिकार द्या, राष्ट्रवादीची मागणी

News Desk