HW Marathi
Covid-19 देश / विदेश महाराष्ट्र

इंधन दरवाढ कायम, जाणून घ्या…आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

मुंबई | देशात सलग २१ दिवसापासून सुरू अलेली पेट्रोल आणि डिझेल यांच्या दरवाढ आजही सुरू आहे. इंधन दरवाढीत आज (२९ जून) डिझेल १३ पैशांनी महागले असून, पेट्रोलची किंमतही ५ पैशांनी वाढली आहे. मुंबईत पेट्रोल ८७.१७  रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ७८.८१  रुपये प्रतिलिटर दर आहे. तर दिल्लीत पेट्रोल ८०.४३  रुपये प्रतिलिटर, तर डिझेल ८०.५३  रुपये प्रतिलिटर दर आहे. डिझेलच्या किमती पेट्रोलपेक्षा अधिक झाल्याचे दिल्लीत पाहायला मिळत आहे.

या महिन्यात डिझेलची किंमत ११.२३ रुपयांनी वाढली आहे, तर पेट्रोलची किंमत ९.१७  रुपयांनी वाढवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या महिन्याच्या कच्च्या तेलाचे दर घसरले, तरीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती सतत वाढत चालल्या आहेत. सध्या भारतीय बास्केट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल ४२ डॉलर इतकी आहे. तरीसुद्धा या महिन्यात जवळपास पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढतच राहिले आहेत.  याचा परिणाम म्हणजे गेल्या २१ दिवसांत डिझेलच्या दरात प्रतिलिटर ११.२३  रुपयांची वाढ झाली आहे. या दिवसांत पेट्रोलच्या दरातही प्रतिलिटर ९.१७ रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे.

 

Related posts

जनावरांची खरेदी विक्री करण्याबाबत केंद्र नरमले

News Desk

#MahatmaGandhi :  देशभरात आजपासून प्लास्टिक बंदी

News Desk

राज्यात रुग्ण बरे होण्याच्या संख्येत विक्रमी वाढ, एकाच दिवशी ४१६१ रुग्णांना घरी सोडले

News Desk